मुंबई : आयपीएल 2021 मध्ये महेंद्रसिंह धोनी याच्या चेन्नई या संघातून खेळणाऱ्या फलंदाज ऋतूराज गायकवाड यानं फार कमी वेळातच क्रीडा जगतामध्ये स्वत:चं स्थान कायम केलं. ऑरेंज कॅपवर वर्चस्व सांगत त्यानं आपल्या खेळाचं प्रमाण सर्वांना दिलं. ऋतूराज हा त्याच्या ऑनफिल्ड खेळासोबतच मैदानाबाहेरील कामगिरीसाठीही सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव हिच्याशी त्याचं नाव जोडलं जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या सामन्यमध्ये ऋतूराजची उत्कृष्ट कामगिरीमुळे सध्या त्याचा क्रिकेट विश्वात बोलबाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच सायलीने एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सायली तिचे कानतले दाखवत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कमेंट्स बॉक्समध्ये एका चाहत्याने प्रतिक्रीया देत म्हटलंय की, ''तुमचे हे आज चांगले खेळले'', तर एका चाहत्याने तर ऋतूराज गायकवाडने कानातले गिफ्ट दिले का? अशी कमेंट केलीये. 


याचबरोबर अजून एका चाहत्याने ऋतु का राज अशी कमेंट केलीये. तर एकाने सायली दिदीला भेटून घे मन शांत होईल दिदीचं अशा अनेक कमेंट सायली संजीवच्या या पोस्टवर पहायला मिळतायेत.



'काहे दिया परदेस' या मालिकेनं सायलीला प्रेक्षकांच्या घरात आणि मनामनात स्थान मिळवून दिलं. मालिकांसोबतच तिनं चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. क्रिकेटपटू ऋतूराज गायकवाड याच्यासोबतची मैत्री किंवा त्यापलीकडे असणाऱ्या नात्यानं कायमत सायलीच्या नावाला क्रीडा जगतातही वाव दिला. अर्थात ऋतूराज किंवा खुद्द सायलीनं यावर कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण, तरीही यांच्या नावांची चर्चा मात्र जोरदार सुरुये हेच खरं.