S.S. Rajamouli: बाहूबली आणि आरआरआर या चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजमौली यांचे नावं आज जगभरातून अभिमानानं घेतलं जातं आहे. त्यांच्या आरआरआर या चित्रपटातील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्याला नामांकित गोल्डन ग्लोब या पुरस्कारनंही सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे एस.एस.राजमौली यांचे कर्तृत्व हे जगात ओळखले जाऊ लागले आहे. परंतु सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे सगळीकडून चर्चांना उधाण आलं आहे. एस. एस. राजमौली यांचे वडील विजयेंद्र प्रसाद (Vijayendra Prasad) हे देखील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. सध्या राजमौली यांचे वडील हे देखील RSS वर एक सिनेमा काढत आहेत आणि त्यासाठी त्यांचे लिखाण सुरू आहे. तेव्हा आपल्या वडीलांनी RSS वर लिहिलं स्क्रिप्ट पाहून राजमौली यांच्या डोळ्यात पाणी आले आहे परंतु असं काय होतं त्या स्क्रिप्टमध्ये चला जाणून घेऊया. (s s rajamouli speaks on rss script written by his father as he gets emotional after reading it entertainment news marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीतून त्यांनी या आगामी चित्रपटाविषयी मोकळेपणानं सांगितले. ते म्हणाले की, मला स्वत:ला RSS बद्दल फारसं काहीच माहिती नाही. राष्ट्रीय सेवा संघाबद्दल (RSS) मी कधी ऐकलेलंही नाही. पण हा संघ नक्की कसा तयार झाला? त्यांचे विचार नेमके काय आहेत? त्या संघटनेचा विकास कसा झाला? हे सर्व मला माहिती नाहीये. माझे वडील हे RSS वरती एक चित्रपट  लिहित आहेत. तेव्हा त्यांची ती लिहिलेली स्क्रिप्ट वाचून माझ्या डोळ्यातून पाणीच आले. मी अत्यंत भावूक झालो. त्यानंतर मी ती स्क्रिप्ट वाचून मी अनेकदा रडलो. म्हणजे मी बऱ्याचदा रडलो. त्या स्क्रिप्टमधील नाट्यानं मला अक्षरक्ष: रडवलं पण त्या माझ्या प्रतिक्रियेचा कथेच्या इतिहासाशी कसलाही थेट संबंध नाही. 


RSS वरच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ते स्वत: करणार आहेत की नाही याबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आपल्याला याबद्दल काहीही अद्याप काही कल्पना नसल्याचे राजमौली यांनी सांगितले. परंतु त्यांचे वडील या RSS वर सुंदर कथा लिहित आहेत. 


नक्की काय म्हणाले एस. एस. राजमौली? 


ही स्क्रिप्ट अत्यंत भावनिक आणि इतकी सुंदर पद्धतीनं लिहिली गेली आहे की मला खूपच आवडली. पण समाजपाप्रती त्याची काय भुमिका असेल हे मला माहिती नाही. माझ्या वडिलांनी लिहिलेल्या कथेचं मा दिग्दर्शन करणार नाही कारण मला याविषयीची खात्री नाही की माझ्या वडिलांनी ही स्क्रिप्ट इतर कोणत्या संस्थेसाठी, लोकांसाठी किंवा निर्मात्यांसाठी लिहिली आहे. माझ्याकडे तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही. माझ्याच वडिलांनी लिहिली कथा दिग्दर्शित करणं ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब राहील परंतु मला त्या स्क्रिप्टच्या परिणामांबद्दल खात्री नाही आणि तो परिणाम हा सकारात्मक असेल की नकारात्मक हेही मी सांगू शकत नाही.