Hrithik Roshan and Saba Azad Breakup : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा त्याच्या कामासोबत त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. त्यात त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान असो किंवा मग त्याची 12 वर्ष लहान गर्लफ्रेंड सबा आजाद असो. हृतिक रोशन गेल्या काही वर्षांपासून सबासोबत रिलेशनशिपमध्ये होता. हृतिक रोशन आणि सबा अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमात एकत्र स्पॉट झाले. इतकंच नाही तर सबा अनेकदा हृतिक रोशनच्या कुटुंबासोबत दिसली आहे. सबासोबत असलेला कुटुंबाचा फोटो हृतिक त्याच्या सोशल मीडियावर अनेकदा शेअर केले आहेत. त्या दोघांनी अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहे. दरम्यान, या सगळ्यात आता अशी चर्चा समोर आली आहे की ते दोघं विभक्त झालं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सबा आझाद आणि हृतिक रोशनचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाते. त्यांची जोडी नेटकऱ्यांमध्ये आणि चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असायची. त्यात आता ते दोघं विभक्त झाल्याचे म्हटले जात आहे. खरंतर असं गेल्या बऱ्याच काळापासून म्हटलं जात आहे की सबा आणि हृतिक आता सोबत नाहीत. मात्र, ही चर्चा समोर आल्यानंतर आता प्रश्न आहे की त्या दोघांचं नातं खरंच मोडलं आहे का? जर मोडलं असेल तर त्याचं कारण काय आहे असा सवाल त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. 



या सगळ्यामागे एक कारण असू शकतं असं अनेकांचं म्हणणं आहे की बऱ्याच काळापासून हृतिक आणि सबा एकत्र दिसले नाही. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नात देखील हृतिक एकटाच दिसला होता. त्यावेळी देखील दोघांमध्ये बिनसल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यानंतर जेव्हा फराह खानच्या आईचं निधन झालं तेव्हा तिला भेटण्यासाठी देखील हृतिक एकटाच आला होता. त्यामुळे ते विभक्त झाल्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या. 


इतकंच नाही तर काही काळापूर्वी सबा आजादनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत एक हिंट दिली होती. तिनं या पोस्टमधून एका गोष्टीचा खुलासा केला होता की हृतिक रोशनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा तिच्या प्रोफेशनल आयुष्यावर खूप परिणाम होत आहे. तिनं सांगितलं होतं की त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे तिला काम मिळत नाही आहे. लोकांना वाटतं की इतक्या मोठ्या कलाकाराची गर्लफ्रेंड आहे, तर मी का काम करेन? त्यामुळे जेव्हापासून ती हृतिकसोबत आहे तिला कामाच्या ऑफर फार कमी येऊ लागल्या आहेत. लोकांनी तिला काम देणं बंद केलं. 


हेही वाचा : 40 शीत वजन कमी करणं होतंय अशक्य! जाणून घ्या जयदीप अहलावतनं कसं केलं वजन कमी?


सबा आजाद एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट देखील आहे. तिनं अनेक जाहिरातींसाठी तिचा आवाज दिला आहे. दरम्यान, आता सगळ्यांना प्रश्न पडला आहे की कामामुळे सबानं हृतिकसोबतचं तिचं नातं संपवलं?