गर्लफ्रेंडसोबत हृतिकला रमलेलं पाहून, काय होती त्याच्या Ex Wife ची प्रतिक्रिया?
सबानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) ही अभिनेता हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) रिलेशनशिपमध्ये आहे. सबानं 1 नोव्हेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा केला आहे. हा दिवस सबा आणि हृतिकसाटी अत्यंत खास होता. तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सबानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला मात्र, सगळ्यांचे लक्ष हे हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानच्या (Sussanne Khan ) कमेंटनं वेधले आहे.
हा व्हिडीओ सबानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत सबा आणि हृतिकचे जीम, डान्स स्टुडीओ आणि पार्कातले असे अनेक फोटो आहेत. तर व्हिडीओच्या शेवटी सबा आणि हृतिक तिच्या वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत सबा म्हणाली, 'मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शांत राहायला आवडतं. त्यादिवशी मी मोठं सेलिब्रेशन करत नाही. मला चुकीचं समजू नका, मला सुद्धा छान पार्टी आवडते. जर त्याआधी मला एक दिवस मिळाला तर...', असे कॅप्शन सबानं दिलं आहे. (Saba Azad Celebrates Birthday With Boyfriend Hrithik Roshan Sussanne Khan comments on it)
पुढे सबा म्हणाली की, 'माझा वाढदिवस माझ्यासाठी एका खास जागेसारखा आहे, माझी इच्छा आहे की पृथ्वीवरील माझे दिवसही तसेच जावे. एक चांगला दिवस तो असतो जेव्हा मी काहीतरी नवीन शिकण्यासाठी वेळ घालवते, माझ्या आवडत्या लोकांसोबत वेळ घालवते. याशिवाय आपला दिवस अधिक खास बनवल्याबद्दल सबानं हृतिकचे आभार मानले. ती पुढे म्हणाली, 'रो खूप छान नियोजन केलंस त्याबद्दल धन्यवाद... सर्वांचे आभार.'
सुझान खानची कमेंट
सबाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खाननं कमेंट केली होती. सुझान म्हणाली, 'देवाचा आशीर्वाद तुमच्या दोघांसोबत राहो.'
दरम्यान, हृतिक आणि सुझानचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'मला तुमचा खूप हेवा वाटतो! पण तुम्हा दोघांना एकत्र पाहून आणि हृतिकच्या आयुष्यात तू जो आनंद आणतेस त्याची कल्पना करून माझ्या डोळ्यात पाणी आलं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुम्हा दोघांना एकत्र पाहून मला आनंद झाला आहे.'