नेटफ्लिक्सच्या पहिल्या भारतीय वेबसीरीजमध्ये सैफ अली खान दिसणार `या` खास भूमिकेत
नेटफ्लिक्सवर पहिल्यांदा भारतीय निर्मिती असलेली वेबसीरीज `स्केअर्ड गेम्स` चा पहिला लूक रसिकांसमोर आला आहे.
मुंबई : नेटफ्लिक्सवर पहिल्यांदा भारतीय निर्मिती असलेली वेबसीरीज 'स्केअर्ड गेम्स' चा पहिला लूक रसिकांसमोर आला आहे.
वेबसीरीजमध्ये राधिका आपटे, नवाजुद्दीन सिद्धिक सोबत सैफ अली खानदेखील झळकणार आहे.
रहस्यमय वेबसीरीज
नेटफ्लिक्सवरील 'स्केअर्ड गेम्स' ही वेबसीरीज अंगावर शहारा आणणारा आहे. या सीरीजमध्ये सैफ अली खान इन्स्पेक्टर सरताज सिंह या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्याच लूकमध्ये सैफच्या हातामध्ये बंदूक आणि रक्ताने माखलेला लूक दिसत आहे. नवाजुद्दीन सिद्धिकी शांत आणि राधिका आपाटे एका हटके लूकमध्ये दिसणार आहे.
कादंबरीतून वेबसीरीजमध्ये रूपांतर
'स्केअर्ड गेम्स' ही कादंबरी आहे. या कादंबरीचे रूपांतर वेबसीरीजमध्ये करण्यात आले आहे. लेखक विक्रम चंद्रा यांनी ही कादंबरी लिहली आहे. आठ सीरीजमध्ये हा शो रसिकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवाने आणि अनुराग कश्यप यांनी केले आहे.
रोमांचक कथा
पोलिस आणि गॅगस्टर यांच्यासोबत माफिया, राजकारणांचा खेळ खास रोमांचक अंदाजात दिसणार आहे. सरताज सिंह या एका पोलिस ऑफिसरच्या रूपात दिसणार आहे. एका गॅंगस्टॅरला पकडण्यासाठी त्याला फोन येतो आणि याकरिता त्याचा थरारक प्रवास वेवसीरीजमध्ये पाहता येणार आहे.