Sadhguru Post on OMG 2:  सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे OMG 2 या चित्रपटाची. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर हा प्रदर्शित झालेला आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे. 2012 साली OMG हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता. तेव्हा अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या भुमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आता बरोबर 11 वर्षांनंतर याच चित्रपटाची पुढचा भाग येतो आहे. या दुसऱ्या पार्टमधून आपल्याला नक्की काय पाहायला मिळणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे आणि सोबतच सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे दोन मोठे सुपरस्टार यावेळेला एकाच दिवशी एकमेकांसमोर भिडणार आहेत. दोन्ही चित्रपटांच्या अॅडव्हान्स बुकींगला सुरूवात झाली असून या आगाऊ तिकीट विक्रीत सनी देओलच्या 'गदर 2'नं बाजी मारली आहे. त्यामुळे आता प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील गणितं काय असतील हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

OMG 2 या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानंही कात्री लावली आहे. या चित्रपटातील काही दृश्यंही कापण्यात आली असून त्यात अनेक बदलही करण्यात आले आहेत. यावेळी या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळतो आहे. त्यातून सोशल मीडियावरही अक्षय कुमार आणि अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे चाहते त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. सध्या यानिमित्तानंच सद्गुरू यांची एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. यावेळी त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी अक्षय कुमारला टॅग केले आहे आणि 'ओह माय गॉड 2' च्या निमित्तानं त्यांनी यावेळी एक संदेश चाहत्यांपर्यंत पोहचवला आहे. सद्गुरू हे कायमच तरूणांना प्रेरणा देताना दिसतात. तरूणांच्या शारीरिक गरजा, स्त्रियांची सुरक्षितता याला उद्देशून त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे जी प्रत्येकानं वाचायलाच हवी. 


हेही वाचा - गर्दीत घुसून तमन्ना भाटियाचा हात धरला; गार्ड्स खवळले, मग अभिनेत्रीनं जे केलं ते पाहाच!


यावेळी अभिनेता अक्षय कुमार यानं सद्गुरू यांच्यासाठी ईशा योगा सेंटर येथे 'ओह माय गॉड 2' या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग भरवले होते. यावेळी सद्गुरू आणि अक्षय कुमारनं एकत्र हा चित्रपट पाहिला व त्यानिमित्तानं सद्गुरू यांनी अक्षय कुमारला टॅग करत एक खास पोस्ट ट्विटरवरून शेअर केली आहे. यावेळी त्या दोघांनी एकत्र वेळ घालवला आणि सोबत फ्लाईंग डिस्क हा गेमही खेळला होता. याचा व्हिडीओही सद्गुरूंनी शेअर केलेला आहे. 


वाचा पोस्ट -



यावेळी सद्गुरूंनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''नमस्कारम अक्षय कुमार. 'ईशा योग केंद्र'मध्ये तुमचे येणे आणि तुमचा चित्रपट OMG 2 बद्दल चर्चा करणे याचा यावेळी अद्भूत योग जुळून आला आहे. आम्ही जरी असा एक समाज निर्माण करण्याच्या तयारी आहोत जो समाज महिलांची सुरक्षितता आणि सन्मान याप्रती फारच संवेदनशील आहे तेव्हा तरूणांना त्यांच्या शारिरीक गरजा सांभाळण्यासाठी आमची शिक्षा प्रमाली ही आमच्या तरूणांना त्यांच्या शरीर, मनं आणि भावनांना सांभळ्यासाठी सक्षम बनवते आहे.''