मुंबई : चक दे इंडिया फेम 'सागरिका घाटगे' आणि क्रिकेटर 'झहीर खान' या दोघांनी आपण रिलेशनशीपमध्ये आहोत या बातमीची घोषणा 24 एप्रिल रोजी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या 10 व्या हंगामानंतर सागरिका आणि झहीर खान यांनी साखरपुडा केला. आणि आता ते नेमके विवाहबद्ध कधी होणार? याची लोकांमध्ये उत्सुकता आहे. पण 2017 च्या शेवटापर्यंत आम्ही लग्न करू असे दोघांकडून सांगण्यात येत आहे. 


एका वेबसाईटला देण्यात आलेल्या  इंटरव्ह्यू मध्ये सागरिका म्हणाली, लग्न ठरले आहे पण अजूनही आमच्या कडून कोणत्याच प्रकारची तयारी झालेली नाही. अजूनही स्थळ ठरलेले नाही, खरेदी झालेली नाही. लग्न म्हटले की वेळ नेहमीच कमी पडतो. असे सागरिकाने एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले आहे.  


सागरिका आणि झहीर खानच्या प्रेम संबंधांबद्दल बोलतानाही सागरिका हसून म्हणाली, ' असं काही होईल याचा विचारही मी केला नव्हता. मी प्रवाहासोबत पुढे जाणारी मुलगी आहे. आत्तापर्यंत सारंचं चांगलं झालंय आणि पुढेही ते चांगलंच होईल असा माझा विश्वास आहे. 


सागरिका झहीरचं कौतुक करताना म्हणाली, 'तो मला नेहमीच समजून घेतो. आम्ही आधी मित्र आहोत आणि त्यानंतर आमच्यात रिलेशनशिप वाढत गेलं. मला माझा साथीदार समजून घेतो.ही प्रत्येक नात्यातील आवश्यक गोष्ट आहे. '


रिलेशनशीपमध्ये अडकल्यानंतर मुलांचा स्वभाव बदलतो का ? 


रिलेशनशीपमध्ये अडकल्यानंतर मुलांचा स्वभाव बदलतो असं अनेक मुलींना वाटतं. पण सागरिकाच्या मते, झहीरच्या स्वभावात अजूनही बदल झालेला नाही. तो पहिल्याप्रमाणेच प्रेमळ, काळजी करणारा आणि खंबीर आहे. पण  परिवाराबद्दलच्या काही बाबतींमध्ये आम्ही दोघांनी एकत्र काही निर्णय घेतले आहेत.  


आम्ही एकत्र विचार करूनच आमच्या साखरपुड्याची बातमी सोशलमिडियावर शेअर केली. झहीरचे मला प्रपोज करणं फारच अनप्रेडिक्टेबल होते. लोकांनीही आम्हांला खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद पाठवले.  


क्रिकेटरला डेट करणं हा रिल आणि रियल लाईफमधला योगायोग कसा ?


चक दे इंडिया या चित्रपटामध्येही सागरिका एका क्रिकेटरला डेट करते. त्यामुळे खर्‍या आयुष्यातही असेच होणं योगा योगाचे आहे. यावर तुमचे मित्र किंवा परिवारातील लोकं काय म्हणाली यावर उत्तर देताना ती म्हणाली घरातील लोकं काही म्हणण्यापूर्वीच मी सारं काही सांगून टाकलं कारण अशा गोष्टींवर मिडीयात खूप उलट सुलट चर्चा होते. पण आमच्या बाबतीत झालेला निव्वळ योगायोग आहे.