Sai Pallavi and Naga Chaitanya : दाक्षिणात्य चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून साई ही तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असल्याचे पाहायला मिळते. एकीकडे साई ही आमिर खानच्या मुलासोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तर दुसरीकडे ती रणबीर कपूरसोबत नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटात माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या सगळ्यात व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्तानं साईनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर साईनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत साईसोबत सुपरस्टार नागा चैतन्य दिसत आहे. घटस्फोटीत नागा चैतन्यचा साईसोबतचा रोमॅन्टिक व्हिडीओ पाहून सगळ्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थित राहिलेत. या व्हिडीओच्या मागच सत्य काही दुसरंच आहे. नागा चैतन्य आणि साई पल्लवी लवकरच थंडेलमध्ये एकत्र दिसणार आहेत. ही जोडी दुसऱ्यांदा कोणत्या चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या आधी 2021 मध्ये पहिल्यांदा नागा चैतन्य आणि साईला कोणत्या लव्ह स्टोरी असलेल्या चित्रपटात एकत्र पाहिलं होतं. एका रिपोर्टनुसार, नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांचा हा व्हिडीओ चित्रपटाच्या टीमकडून व्हॅलेंटाईन डे स्पेशन प्रोमो क्लिप शेअर केली आहे. 18 सेंकदाच्या या क्लिपमध्ये चैतन्य त्याच्या प्रेयसीला हसत बोलता आणि साई पल्लवी लाजत उत्तर देते. दरम्यान, आगामी चित्रपटात ते दोघंही लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याचा भूमिकेत दिसणार आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 


दरम्यान, नागा आणि साईच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन चंदू मोंडेती दिग्दर्शित करत आहेत. 'थंडेल' ची पटकथा ही रियल लाइफ बेस्ड स्टोरीवर आहे. असं म्हटलं जातं की नुकतंच या टीमनं एक शूटिंग शेड्यूल पूर्ण केलं आहे. साई पल्लवी एकामागे एक आगामी प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यात व्यग्र आहे. 


हेही वाचा : 'या' आलिशान हॉटेलमध्ये रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी घेणार सप्तपदी!


रिपोर्ट्सनुसार, साई पल्लवी आणि जुनैद खान हे दोघं देखील एकत्र एका लव्ह स्टोरीमध्ये दिसणार आहेत. ज्याचं दिग्दर्शन सुनील पांडे करणार आहेत. आता या चित्रपटाच्या टायटलविषयी बोलायचे झाले तर अजून कोणतीही अनाउंसमेट करण्यात आलेली नाही. तर नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटात माता सीतेच्या भूमिकेत नक्की साई दिसणार आहे की नाही याची देखील अजून खात्री झालेली नाही.