Sai Pallavi Wedding : दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही लाखो मुलांच्या हृदयावर राज्य करते. तिचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. साई पल्लवी ही बिना मेकअप लूकसाठी किती फेमस आहे याविषयी काही सांगायची गरज नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ती लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा फक्त अभिनय नाही तर तिच्या डान्सिंग स्किल्स देखील तितक्याच चांगल्या आहेत. तिच्या डान्सचे देखील काही चाहते आहेत. तिच्या चाहत्यांना तिच्या सगळ्या अपडेट्स जाणून घ्यायच्या असतात. सध्या साईचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी म्हटलं आहे की साईनं अखेर लग्न केलं आहे. चला तर जाणून घेऊया त्या मागचं सत्य... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साई पल्लवीच्या फॅन क्लबनं त्यांच्या पेजवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत साई पल्लवी एका व्यक्तीसोबत दिसत आहे. या दोघांच्या गळ्यात फुलांचा हार आहे. त्यासोबत त्या दोघांच्या कपाळावर टीका देखील आहे. त्यांचा हा फोटो पाहून त्या दोघांनी खूप साधारण पद्धतीनं लग्न केल्याचं म्हटलं आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं आहे की अखेर साईनं लग्न केलं. तर त्यांनी लग्न करत हे सिद्ध केलं की प्रेमाचा रंग नसतो. साई तुला सलाम. त्या फॅन पेजवर असं कॅप्शन का दिलं याविषयी अनेकांना प्रश्न पडला असेल तर साई पल्लवी आणि त्या व्यक्तीमध्ये असलेला वर्ण भेद. साईनं राजकुमार पेरियामासामीसोबत गुपचुप लग्न केल्याचे म्हटले जात होते. 



हेही वाचा : प्राजक्ता माळीच्या ‘तीन अडकून सीताराम’मधील ‘दुनिया गेली तेल लावत’ गाणं प्रदर्शित



साईच्या या व्हायरल झालेल्या फोटोवर अनेकांनी कमेंट करत त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कारण आजकाल अनेक सेलिब्रिटी ही गुपचूप पद्धतीनं लग्न उरकत आहेत. त्यामुळे अनेकांना या बातमीवर विश्वास झाला. मात्र, त्या फोटोमागचं सत्य काय आहे. हे आता समोर आलं आहे. या फोटोचं सत्य तेव्हा समोर आलं जेव्हा दिग्दर्शक राजकुमारनं त्याच्या एक्स अकाऊंट म्हणजे ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की या चित्रपटात तिच्यासोबत तिचा सह-कलाकार Sivakarthikeyan आहे. त्या दोघांचा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचं नाव SK21 आहे आणि हा फोटो मूव्ही लॉन्चच्या कार्यक्रमा दरम्यानचा आहे. फोटोत राजकुमारसोबत साई पल्लवी दिसणार आहेत. तर त्या दोघांच्या गळयात फुलांचा हार आहे. हा हार पूजे दरम्यान त्यांना घालण्यात आला होता.