मुंबई : ह्या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणार आहे  कारण अनेक जेष्ठ कलाकारां सोबत तरुण पिढीतल्या कलाकारांचा देखील गौरव केला जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'मराठी पाऊल पडते पुढे' पुरस्कार, ह्यावर्षी या पुरस्काराची मानकरी ठरली ती म्हणजे ग्रेसफुल सांगलीची कन्या 'सई ताम्हणकर'. सई ताम्हणकर फक्त एक उत्कृष्ट कलासंपन्न अभिनेत्रीच आहे असे नाही ती एक उत्तम ऑरेंज बेल्ट कराटेपटू आणि राज्यस्तरीय कब्बडी पटू देखील आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सई ताम्हाणकरचा अभिनय प्रवास अनेक वेगवेगळ्या धर्तीचे हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, वेब्सिरीज असं अव्याहत चालू आहे. चित्रपटातल्या हिरोएवढंच महत्व  हेरॉईनला मिळायला हव असं नेहमीच म्हणतात. पण खूपदा सई हिरो पेक्षा जास्तीचा भाव खाऊन जाते. फक्त सईसाठी चित्रपट पाहणारे लाखो चाहते आहे. अस असूनही सई एकच प्रकारच्या भूमिकेत न अडकता विविध प्रकारच्या भूमिकां मध्ये ती चमकते. 


हिम्मत आहे तर किंमत आहे आणि तरच जगण्यात गंमत आहे हे सईने वेळोवेळी सिद्ध केलं आहे. अनेक उत्कृष्ट सिनेमांमधून  काम करून तिच्यातील अभिनय प्रगल्भता तिने दाखून दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्या मोजक्या अभिनेत्रींनी खऱ्या अर्थाने ग्लॅमर आणला त्यात सई ताम्हाणकरचा खूप मोठा खारीचा वाटा आहे. अशा हरहुन्नरी हिरकणीकडे बघून अत्यंत अभिमानाने आपण म्हणू शकतो कि, मराठी पाऊल पडते पुढे !  रविवार २६ मार्चला संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर. चर्चा रंगणार बातमी गाजणार! ''झी चित्रगौरव पुरस्कार २०२३'' प्रसारित होत आहे. 



याचबरोबर हा पुरस्कार सोहळा बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. कारण या मंचावर रश्मिका मंदाना चंद्रा गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. तिचा हा परफॉर्मेन्स पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे. याचबरोबर ज्यांनी आपल्या सिनेसृष्टीला एक पेक्षा एक चित्रपट दिले असे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सुद्धा जीवन गौरव प्रदान करण्यात येणार आहे. हा विलक्षण सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षकही प्रचंड उत्सुक आहेत.