Sai Tamhankar Crime Beat Webseries: सध्या वेबसिरिजचा जमाना आहे आणि त्यातून आता सर्वत्र चर्चा असते ती म्हणजे त्यातल्या बोल्ड सीन्सची. काही दिवसांपुर्वीच 'सिटी ऑफ ड्रिम्स' या वेबसिरिजचा तिसरा सिझन प्रदर्शित झाला आहे. या सिरिजमधल्या पहिल्या सिझनमध्ये चर्चा रंगली होती ती म्हणजे प्रिया बापटच्या लेस्बियन सीनची. तिचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता त्यामुळे चर्चांना एकच उधाण आलं होतं. प्रियाला या सीनबद्दल अनेकदा विचारण्यात आले होते. त्यावर प्रियानं जाहीर स्पष्टीकरणही दिलं होतं. आता प्रियाच्या या बोल्ड सीननंतर सईच्या लेस्बियन सीनची चर्चा रंगली आहे. तिची 'क्राईम बीट' ही वेबसिरिज सोशल मीडियावर चांगली व्हायरल होते आहे. या सिरिजचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सईनं तिच्या इन्टाग्राम अकांऊंटवरून तिच्या आगामी वेबसिरिज टीझर प्रदर्शित केला आहे. ज्यात साकीब सलीम, राहूल भट्ट, आदिनाथ कोठारे, सबा आझाद, सई ताम्हणकर, किशोर कदम यांच्या तगड्या भुमिका दिसत आहेत. यावेळी एका सीनमध्ये सईच्या लेस्बियन लिपलॉकची झलक दिसली आहे त्यामुळे चर्चांना एकच उधाण आलं. सईच्या या आगळ्यावेगळ्या भुमिकेसाठी तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुकही केले आहे. त्यामुळे या टीझरला चांगलेच लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत. ही सिरिज कॉमनवेल्थ गेम्समधील भ्रष्टाचार आणि राजकीय नेत्यांचा त्यातील संबंध यावर आधारित असल्याचे कळते आहे. 


हेही वाचा - लग्नाआधी गरोदर असेलल्या बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा? मिस्ट्रीमॅनसोबत फोटो शेअर


यावेळी सईच्या लेस्बियन सीनची चर्चा आहे. तीही या टीझरमध्ये बोल्ड आणि ब्युटीफूल अवतारात दिसते आहेत. यामध्ये स्विमिंग पूलमध्ये सईचा हॉट लेस्बियन सीनची झलक पाहायला मिळते आहे. यावेळी या सिरिजची प्रेक्षकांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. ही सिरिज zee5 या अॅपवर प्रदर्शित होणार आहे. सुधीर मिश्रा आणि संजीव कौल यांची ही वेबसिरिज आहे. यामध्ये तूफान एक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या या टीझर खाली लोकप्रिय कलाकारांनीही कमेंट्स केल्या आहेत. यावेळी प्रिया बापटनंही सईच्या या आगामी वेबसिरिजचं कौतुक केलं आहे. यावेळी तिनं कमेंटमध्ये 'ब्रिंग इट ऑन'. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सई सध्या ओटीटीवर सक्रिय झाली आहे. मागील वर्षी तिची 'समांतर' ही वेबसिरिज तूफान गाजली होती. त्यामुळे तिच्या या वेबसिरिजची चांगलीच चर्चा होती. सईनं 'मिम्मी'मध्ये केलेल्या भुमिकेचेही खूप कौतुक झाले. तिला आयफा अवोर्डही प्राप्त झाला. आता तिच्या या आगामी चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.