Saif Ali Khan And Kareena Got Trolled Over Seat Belt : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor Khan) हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल पैकी एक आहे. सैफ आणि करीना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. जेव्हा पण सैफ आणि करीना एकत्र दिसतात तेव्हा सगळ्यांचे लक्ष हे फक्त त्यांच्यावर असते. दरम्यान, करीना आणि सैफचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैफ आणि करीनाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओत Saif आणि Kareena Kapoor Khan गाडीत बसल्याचे दिसत आहे. त्याचवेळी पापाराझींनी त्यांना कॅप्चर केले आहे. हे दोघे जेव्हा एकत्र त्यांच्या सोसायटीच्या बाहेर पडले तेव्हा पापाराझींनी व्हिडीओ काढला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करीनानं पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केला असून सैफनं निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. त्यांचा हा कॅज्युअल लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. यावेळी करीना नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे. दरम्यान, त्या दोघांना एक छोटीशी चूक महागात पडली आहे. यामुळे नेटकऱ्यांनी सैफ आणि करीनाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे. (Saif Ali Khan And Kareena Kapoor Khan Trolled) 


पाहा व्हिडीओ -


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सैफ आणि करीनानं गाडीत बसल्यानंतर सीट बेल्ट लावले नाहीत. याकडे काही नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. हे पाहताच नेटकऱ्यांनी त्या दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'सीट बेल्ट का नाही लावला?' नेटकरी म्हणाला, 'काही नाही, नियम हे फक्त सर्वसामान्य लोकांसाठी असतात.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'हे लोक कधीच सीट बेल्ट लावत नाही आणि मुंबई पोलिस कधीच यांना पडकत कशी नाही?' 


हेही वाचा : Akshay Kumar च्या लेकासोबत दिसणारी 'ही' मुलगी आहे तरी कोण? लंडनमध्ये आहेत एकत्र


दरम्यान, करीनाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, करीना लवकरच दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. सुजॉय घोष यांचा हा चित्रपट 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' (The Devotion of Suspect X) या पुस्तकावर आधारित आहे. करीना शिवाय या चित्रपटात विजय वर्मा आणि जयदीप अहलावत देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून करीना ओटीटीवर डेब्यू करणार आहे. याशिवाय करीनाकडे दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या चित्रपटात देखील करीना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अजून ठरलेले नाही. दुसरीकडे सैफच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सैफ लवकरच 'आदिपुरुष' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील सैफचा लूक चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, या चित्रपटात सैफसोबत अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन दिसणार आहे.