मुंबई : अभिनेता सैफ अली खान लवकरच एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'नेटफ्लिक्स'वरच्या बहुचर्चेत 'सॅक्रेड ग्रेम्स'नंतर आता सैफचा 'हंटर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिनेमात सैफ एका योद्ध्या नागा साधूच्या भूमिकेत दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हंटर' सिनेमातील सैफचा हाच योद्ध्या नागा साधूच्या वेशातील लूक सोशल मीडियावर लीक झालाय. 


४८ वर्षीय सैफचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना आकर्षक वाटतोय. काजळ भरलेले डोळे, लांब केस, डोक्यावर कपडा गुंडाळलेला, वाढलेली दाढी अशा अवतारात प्रेक्षक त्याला कदाचित पहिल्यांदाच पाहतील.



सैफचा हा लूक हॉलिवूड अभिनेता डॉनी डेप याच्या लूकशी खूपच साधर्म्य साधताना दिसतोय. 


दिग्दर्शक नवदीप सिंह याचा क्राईम थ्रिलर 'हंटर' या सिनेमाचं राजस्थानमधील शुटींग पूर्ण झालंय. उर्वरित सिनेमाचं शुटींग आता मुंबईत पार पडणार आहे. फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये सैफ या अवतारात दिसला.