मुंबई : अभिनेता सैफ अली खान कायम त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मुलांसोबत बाहेर फिरायला किंवा, हॉटेलमध्ये जात असतो. आता देखील सैफला अभिनेत्री सारा अली खान आणि इब्राहिम अली खानसोबत एका हॉटेल बाहेर सपॉट करण्यत आलं. सैफचे त्याच्या मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खान कुटुंबाचा हा व्हिडीओ अनेकांना आवडला, तर काहींनी मात्र त्यांच्या व्हिडीओला विरोध केला.  रमजान महिना असून देखील हॉटेलमध्ये गेलेल्या सैफ आणि त्याच्या मुलांना ट्रोलींगचा सामना करावा लागत आहे. 



अनेकांनी तिघांना नाव बदलण्याचा सल्ला दिला. व्हिडीओवर कमेंट करत एक युजर म्हणाला, 'रमजानमध्ये लंच... ' तर दुसरा युजर म्हणतो, 'कसा मुसलमान आहेस, रमजानमध्ये लंच करतो...'



सध्या सैफ, सारा आणि इब्राहिमचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक लोक सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाला सपोर्ट करताना दिसले. त्यांच्या समर्थनार्थ उभ्या असलेल्या नेटिझन्सनी सांगितले की, 'उपवास ठेवायचा की नाही, हे लोकांच्या इच्छेवर अवलंबून आहे....'


सैफ पहिलं लग्न अमृता सिंगशी  केले होते. या नात्यातून त्यांना दोन मुले आहेत - सारा अली खान आणि इब्राहिम अली खान. सैफची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री करिनासोबत सारा आणि इब्राहिमचे चांगले संबंध आहेत.