`हाऊस ऑफ पतौडी` बद्दल Saif Ali Khan चा मोठा खुलासा, ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
`हाऊस ऑफ पतौडी` बद्दल मोठं गुपित समोर, खुद्द सैफ म्हणाला...
मुंबई : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता एका खास गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. ही खास गोष्ट सैफने विनोदवीर कपील शर्माच्या 'द कपील शर्मा शो'मध्ये बोलून दाखवली. 'द कपील शर्मा शो' च्या येत्या भागामध्ये सैफ अली खानसोबत अभिनेत्री राधिका आपटे देखील दिसणार आहे. या दोघांनी सेटवर येताच खळबळ उडवून दिली.
यादरम्यान कपिलने चाहत्यांना सांगितले की, सैफ अली खानने स्वतःचा कपड्यांचा ब्रँड (clothing brand) सुरू केला आहे. याचं नाव 'हाऊस ऑफ पतौडी' (House of pataudi). जो सध्या एक प्रसिद्ध ब्रँड म्हणून नावारुपास आला आहे. सध्या सर्वत्र 'हाऊस ऑफ पतौडी'ची चर्चा आहे.
सध्या शोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Saif Ali Khan Social Media) तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कपील सैफला ब्रँडबद्दल विचारतो, ''हाऊस ऑफ पतौडी' मध्ये फक्त पतौडी घालतात तेच कपडे मिळतात?'
यावर सैफ म्हणतो, ''हाऊस ऑफ पतौडी'मध्ये सर्व प्रकारचे कपडे मिळतात. फक्त जे कपडे विकले नाही गेले, ते मी घालतो...' सैफच्या या वक्तव्यावर जमलेला प्रत्येक जण हासू लागतो.
सैफचे आगामी सिनेमे... (Saif Ali Khan upcoming Film)
सध्या सैफ अली खानचा विक्रम वेध सिनेमा चर्चेत आहे. सिनेमात सैफसोबत अभिनेता हृतिक रोशन दिसणार आहेत. सिनेमात सैफ एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर हृतिक रोशन वेधाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दोघांचा सिनेमा साऊथच्या विक्रम वेधा या सिनेमाचा रिमेक आहे. सध्या या सिनेमाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 30 सप्टेंबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.