मुंबई : स्टारकिड्स कायम त्याच्या फॅशन सेन्स आणि सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असतात. आता कलाकारांपेक्षा जास्त अधिक चर्चा त्यांच्या मुलांच्या लाईफस्टाइलची होते. एवढंच नाही तर गेल्या काही दिवसांपासून स्टारकिड्सच्या अफेअर्सच्या चर्चा देखील रंगत आहेत. सध्या चर्चा होत आहे ती म्हणजे अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी यांच्या नात्याची...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी




पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान सध्या चर्चेत आहेत. दोघेही वांद्रे येथील एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसले. दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.


नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी




सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेली नंदा एकमेकांना डेट करत आहेत. सहा महिन्यांहून अधिक  काळ दोघे एकत्र आहेत. खासगी आयुष्याबद्दल विचारल असता सिद्धांत चतुर्वेदी हिंट देत  म्हणाला की, माझ्या आयुष्यात खास व्यक्ती आहे, पण ती इंडस्ट्रीतील नाही.


जान्हवी कपूर आणि अक्षत रंजन




2021 मध्ये जान्हवी कपूर आणि अक्षत रंजन यांच्या डेटिंगच्या अफवा पुन्हा समोर आल्या. 'धडक'चा भाग होण्यापूर्वी तो जान्हवीला डेट करत होता. अक्षत रंजन गॅमन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा वारस आहे.


सारा अली खान आणि जेहन हांडा




जून 2021 मध्ये, सारा अली खान आणि जेहान हांडा एकत्र असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सारा अली खान आणि जेहन हांडा अनेक एकत्र दिसले आहेत. पण दोघांनी चांगले मित्र असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला.