मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या सैफ त्याच्या आगामी 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा सैफच्या अडचणीत वाढ होत आहे. सध्या सैफचा एक जुना व्हिडीओ समोर येत आहे, ज्यामध्ये तो श्री रामा यांचं नाव घेताना दिसत आहे आणि या व्हिडिओमुळे त्याच्या विरोधात वाद सुरु झाला असून आता त्याच्या आगामी चित्रपटाविरोधात बॉयकॉट ट्रेन्ड (Boycott Vikram Vedha) सुरु झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये सैफ अली खानने सांगितले की तो आपल्या मुलाचे नाव राम का ठेवू शकत नाही आणि याच कारणामुळे तो सध्या प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.


आणखी वाचा : MMS लीक झाल्यानंतर 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोराचा, बेड रूम फोटो लीक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान स्टारर 'विक्रम वेधा' हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग देखील सुरु झालं आहे. ऋतिक आणि सैफ अली खान यांचा चित्रपट या वर्षातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरला आहे. लोकांना ऋतिकचा अभिनय आणि सैफचा स्वॅग खूप आवडतो. दरम्यान, सैफचा एक जुना व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे, (Saif Ali Khan's Old Video On Taimur's Name) हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक संतापले आहेत आणि या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. वास्तविक या व्हिडिओमध्ये सैफ त्याचा मुलगा तैमूरबद्दल बोलताना (Taimur Ali Khan) दिसत आहे. त्यात सैफ म्हणाला, अॅलेकझॅन्डर किंवा राम हे नाव ठेवता येणार नाही. 


आणखी वाचा : विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या....; यादीतलं चौथं नाव धक्कादायक


व्हिडीओमध्ये सैफ म्हणतोय मला इंटरनॅशनल नाव हवं आहे. 'मी माझ्या मुलाचं नाव अॅलेकझॅन्डर किंवा राम ठेवू शकलो नाही. तेव्हा विचार केला की चांगलं मुस्लिम नाव का ठेवू नये.' तो पुढे म्हणाला की 'मी त्यांना धर्मनिरपेक्ष मूल्यांसह वाढवण्याची आशा करतो जेणेकरून ते एकमेकांचा आदर करतील.' (Saif Ali Khan Video About Not giving Lord Ram Name To Taimur Viral Befor The Release Of Vikram Veda) 


आणखी वाचा : वजनावर विनोद करणाऱ्या सुत्रसंचालकावर संतापली विशाख सुभेदार, म्हणाली...



आणखी वाचा : अरे देवा! पत्नीनेच नवऱ्याचं Ex Girlfriend सोबत लावलं लग्न, आता कसा सुरु आहे त्रिकोणी संसार? पाहा


सैफ अली खान चित्रपटात ऋतिकला टक्कर देताना दिसणार आहे. सैफ या चित्रपटात हीरोच्या भूमिकेत आहे पण ऋतिकसमोर त्याची फी खूपच कमी आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी सैफनं 12 कोटी रुपये मानधन म्हणून घेतले आहेत. या चित्रपटात सैफ अली खान हा पोलिसाच्या भूमिकेत आहे, तर ऋतिक गँगस्टरच्या भूमिकेत आहे.