Jaane Jaan Trailer : बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या आगामी ओटीटी डेब्यू चित्रपट जाने जानमुळे सध्या चर्चेत आहे. करीना कपूर त्याच्या वाढदिवसाला 21 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटातील करिनाच्या थ्रिलिंग स्टाइलची खूप चर्चा होते आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात करीनासोबत विजय वर्मा आणि जयदीप अहलावत सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. (saif ali khan warned kareena kapoor khan reveals before work with vijay verma and jaideep ahlawat video viral on social trending now)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ट्रेलर लॉन्चदरम्यान करीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये तिने ओटीटी दुनियात पाऊल ठेवताना तिला कसं वाटतं आणि सैफ अली खानने तिला या चित्रपटापूर्वी तिला दिलेला इशाराबद्दल सांगितलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Netflix India (@netflix_in)


मुंबईत झालेल्या सोहळ्यात तिने चित्रपटासंबंधित अनेक रंजक किस्से सांगितले आहेत. करीना यावेळी म्हणाला की, मी 23 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये रेफ्युजीतून पदार्पण केलं. त्यावेळी मी जितकी नर्व्हस नव्हते त्यापेक्षा जास्त आज मी नर्व्हस आहे. तिने यावेळी सांगितलं की सैफ अली खानने विजय वर्मासोबत काम करण्यापूर्वी एक महत्त्वाचा सल्ला दिला होता. 


करीना म्हणाली की, सैफ मला म्हणाला होती की, व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकअप करुन सेटवर जाऊन डायलॉग म्हटलं. हे तुझे ॲटिट्यूड या चित्रपटाच्या वेळी तुला सोडावे लागेल. मी त्या दोघांना काम करताना पाहिलं आहे. विजय वर्मा आणि जयदीप यांच्यासोबत काम करताना तुला याच्या रोलसाठी मेहनत करावी लागेल. ते कायम इम्प्रोवाइज करत राहतात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Koimoi.com (@koimoi)



करीनाने सैफ अली खानच्या इशाराबद्दल सांगितल्यावर विजयनेही त्यावर उत्तर दिलं. तो म्हणाला की, मला सैफ अली खानचे आभार मानायचे आहेत, कारण ते नसते तर आम्हाला कोणीही ओळखलं नसतं. कौन हैं ये दो लडके असं म्हणतो तो हसायला लागला.  सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.