मुंबई : लॉकडाऊननंतर अनलॉक १ मध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडताना दिसले. या शिथिलतेचा फायदा अभिनेता सैफ अली खान याने पत्नी अभिनेत्री करीना कपूर आणि मुलगा तैमूरसोबत घेतला आहे. आजचा रविवार हा सैफ, करीना आणि तैमूरसाठी खास होता. घरातून बाहेर पडत आज या तिघांनी मोकळा श्वास घेतला आहे. हे तिघं देखील मरीन ड्राईव्हवर चालताना दिसले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र अद्याप सामान्यांच जनजीवन पूर्वपदावर आलेला नाही. अजूनही सामान्य नागरिक घरात आहे. असं असताना करीना, सैफ आणि तैमूर मोकळ्या हवेचा आनंद लुटत आहेत. 



तैमूरचे अनेकदा शाळेत जातानाचे व्हिडिओ आपण पाहिले आहेत. पण या लॉकडाऊनच्या काळात तैमूरच्या चाहत्यांना ही संधी मिळाली नाही. लॉकडाऊनमध्ये तैमूर देखील घराबाहेर पडला नसेल. खूप दिवसांनी तैमूरचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे त्याच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.



मरीन ड्राईव्ह ही मुंबईकरांची आवडती जागा. अगदी सामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांनाच ही जागा हवीहवीशी वाटते. मुंबईची एक वेगळी ओळख म्हणजे मरीन ड्राईव्ह आहे. दिवसभर या ठिकाणी नागरिकांची रेलचेल असते. पावसाळ्यात या ठिकाणी मनमुराद भिजण्याची मज्जा काही औरच आहे.