मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालच्या (Saina Nehwal Biopic) बायोपिकची चर्चा असताना कोच पुलेला गोपीचंद (Coach Pullela Gopichand) यांच्या भूमिकेचा पहिला लूक समोर आला आहे. बायोपिकमध्ये सायनाची भूमिका अभिनेती परिणीती चोप्रा (Parinieeti Chopra)  साकारणार असून सिनेमाचं शुटिंग देखील सुरू झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायनाच्या जीवनात तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच महत्वाचं स्थान आहे. यामुळे बायोपिकमध्ये या भूमिकेसाठी अभिनेता मानव कौल (Manav Kaul)ची निवड करण्यात आली असून मानव कौलने आपला पहिला लूक शेअर केला आहे. 



या सिनेमात प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या भूमिकेसाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मोठ्या पडद्यावर पुलेला गोपीचंद यांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता मानव कौल याच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. 


मानव कौल यांनी प्रशिक्षक गोपीचंद यांच्या भूमिकेतील पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावर सायना नेहवालने आपली प्रतिक्रिया दिली असून Amazing असे उद्गार काढले आहेत. 



सायना नेहवाल हीची बायोपिक दिग्दर्शक आणि अमोल गुप्ते दिग्दर्शित करत आहे. सुरूवातीला अभिनेत्री श्रद्धा कपूरची निवड झाली होती. मात्र, काही खासगी कारणामुळे तिला ही भूमिका साकारणं शक्य नव्हतं. असं देखील म्हटलं जातंय की, डेंग्यू झाल्यामुळे अभिनेत्री श्रद्धाने ही भूमिका सोडली. यानंतर अभिनेत्री परिणीती चोप्राची वर्मी या भूमिकेसाठी लागली.