मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कलाविश्वात त्याचप्रमाणे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री सायरा बानो यांनी देखील सुशांतच्या आत्महत्येवर दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून माझी झोप उडाली असल्याचे वक्तव्य त्यांनी झी न्यूजसोबत बोलताना केलं आहे. त्या म्हणाल्या, 'मला या गोष्टीबाबत  बोलण्यास अत्यंत दुःख होत आहे. ज्या प्रकारे एका प्रसिद्ध अभिनेत्याने असं टोकाचं पाऊल उचललं आहे. काही कळायला मार्ग नाही. त्याला अत्यंत त्रास झाला असणार .' असं देखील त्या म्हणाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तो कदाचीत फार अडचणीत असल्याची शक्यता देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली. बॉलिवूडमध्ये सध्या अत्यंत वाईट काळ सुरू आहे. आतापर्यंत २०२० सारखं वर्ष कधीही पाहिलं नाही. संपूर्ण जग मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. हे लवकरात लवकर संपायला हवं. त्यासाठी सर्वांनी देवाकडे प्रर्थना करण्याची गरज आहे असं देखील त्या म्हणाल्या. 


शिवाय त्यांना दिलीप कुमार यांच्या प्रकृतीसंबंधी देखील प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्या की, त्यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही जेष्ठ नागरिक असल्यामुळे स्वतःची काळजी घेत आहोत. शिवाय हे संकट दूर जाण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. 


दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या अचानक जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येमागील नक्की कारण काय आहे. याचा पोलीस तपास घेत आहेत. मुंबईतील मोठ्या निर्मात्यांनी सुशांत सिंह राजपूत यांच्यावर बहिष्कार घातला होता याचीही चर्चा आहे. त्यामुळे या सगळ्या दृष्टीकोनातून मुंबई पोलीस चौकशी करत आहेत.