रिंकू-आकाशपेक्षा इतक्या पट्टीने अधिक कमावणार जान्हवी-ईशान!
मराठी सुपरहिट सिनेमा सैराटचा हिंदी रिमेक धडक मधून जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे.
मुंबई : मराठी सुपरहिट सिनेमा सैराटचा हिंदी रिमेक धडक मधून जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. आता धडक प्रदर्शनाच्या टप्पावर येऊन ठेपला आहे. सैराट सुपरहिट ठरल्यामुळे हिंदीत धडक काय कमाल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर जान्हवीकडूनही प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.
धडक सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रीया मिळाल्या होत्या. हिंदी रिमेक व्हायला नको होता, असे अनेक युजर्सचे म्हणणे होते. आता धडकच्या प्रदर्शनाला फक्त १ दिवस बाकी असताना सैराट आणि धडकमध्ये तुलना सुरु झाली आहे.
ट्रेलर
सैराट हा सिनेमा २०१६ मध्ये आला होता. याच्या ट्रेलरला फक्त ६ लाख व्हीज मिळाले होते. तरी देखील सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. धडकच्या ट्रेलर ४,४५ कोटी व्हीज मिळाले असले तरी युजर्सच्या प्रतिक्रीया फारशा चांगल्या नव्हत्या.
बजेट
सैराट या मराठी सिनेमाचे बजेट फक्त ४ कोटी रुपये होते. लो बजेट सिनेमा असूनही रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरच्या दमदार अभिनयाने सिनेमाला चार चाँद लावले. अन् सैराट हिट झाला. तर धडक सिनेमाचे बजेट ५० कोटी होते. त्याचबरोबर २० कोटी रुपये जाहिरात आणि मार्केटिंगसाठी खर्च करण्यात आले. म्हणजेच सिनेमाचे एकूण बजेट ७० कोटी रुपये आहे.
आकाश-रिंकूला मिळाले इतके मानधन
सैराटमधील दमदार अभिनयाबद्दल आकाश-रिंकूला ५ लाख रुपये मिळाले होते. पण सिनेमाने १०० कोटींहून अधिक गल्ला केला.
जान्हवी-ईशानचे मानधन
सैराटचा हिंदी रिमेकमध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत आहेत. या भूमिकेसाठी दोघांनाही ६० लाख रुपये मानधन देण्यात आलं आहे. आता धडक बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सैराटचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
१०० कोटींचा गल्ला करणारा सैराट हा पहिला मराठी सिनेमा होता. राज्यभरातून सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळाला होता.
धडकचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर या सिनेमातून पर्दापण करत असल्याने सिनेमाला प्रेक्षक गर्दी करतील. हा सिनेमा १०० कोटींचा आकडा सहज पार करेल, असे बोलले जात आहे. पण त्यापेक्षा अधिक कमाई केल्यास सिनेमा सुपरहिट ठरेल.