मुंबई : 'सैराट' या सिनेमाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं. एवढंच नाही तर मराठी सिनेमा सातासमुद्रापार नेण्यात सैराटचा मोठा वाटा आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्या सिनेमातून पारंपरिक सिनेमाची चौकट मोडून प्रेक्षकांना वेगळ्या सिनेमाची वाट दाखवली. आता सैराटचा रिमेक येत आहे. करण जोहर 'धडक' हा सैराटचा रिमेक घेऊन येत आहे. 20 जुलै रोजी हा सिनेमा प्रेक्षकगृहात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाला स्वतः नागराजने खास शुभेच्छा दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आपल्याला माहित आहे. नागराज मंजुळे हा श्रीदेवीचा खूप मोठा फॅन आहे. आणि या सिनेमातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि ईशान खत्तर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाला अजय - अतुलनेच संगीत दिलं आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर आहेत. असं असताना नागराज मंजुळेने स्वतः धडक या सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत. 


सैराट या मराठी सिनेमाचे बजेट फक्त ४ कोटी रुपये होते. लो बजेट सिनेमा असूनही रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरच्या दमदार अभिनयाने सिनेमाला चार चाँद लावले. अन् सैराट हिट झाला. तर धडक सिनेमाचे बजेट ५० कोटी होते. त्याचबरोबर २० कोटी रुपये जाहिरात आणि मार्केटिंगसाठी खर्च करण्यात आले. म्हणजेच सिनेमाचे एकूण बजेट ७० कोटी रुपये आहे. त्यामुळे आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती गल्ला कमावतो याकडे साऱ्यंच लक्ष लागून राहिलं आहे.