मुंबई : लॉकडाऊनमध्ये रिल हिरो सोनू सूद हा रिअल हिरो ठरला. सोनू सूदने अनेक मजुकांना आपल्या घरी पोहोचवण्याचं काम केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. असाच मराठमोळा अभिनेता देखील गरजूंसाठी काम करताना दिसत आहे. हा अभिनेता आहे लोकप्रिय ठरलेल्या 'सैराट' सिनेमातील सल्या म्हणजे अरबाज शेख. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. या परिस्थितीत स्थलांतरीत मजुरांप्रमाणे गावा-खेड्यातील गरजू कुटुंबियांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. अशावेळी सोलापूर जिल्ह्यासाठी कार्यरत असलेल्या सचिन अतकरे यांच्यासोबत 'wewillhelp' या संस्थेमार्फत काम करत आहे. 



अरबाज गावातील प्रत्येक घरात जाऊन रेशनकार्ड आहे की नाही याची माहिती घेतो. रोजगार गेला तर सध्या कसे दिवस काढताय? गावातील ५० ते ६० घर फिरून तो गरजू घरांची माहिती मिळवतो. योग्य ती माहिती घेऊन अरबाज धान्याचं किट आणण्यासाठी दुकानात जातो. आणि मग त्या कुटुंबियांना वाटप करतो. 


१०० कोटीचा गल्ला जमवून 'सैराट' सिनेमाने एक वेगळीच उंची गाठली. पण या सिनेमातील कलाकार मात्र अजूनही जमिनीवर पाय रोवून असल्याच दिसतंय. अरबाज ज्या गावात राहतो त्या करमाळा गावात एकही कोरोनाबाधित रूग्ण नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या जगण्याचा संघर्ष संपला आहे. 


लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमुळे इतर समस्यांना गावकऱ्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे कोरोना नाही पण जगण्याचा मूळ प्रश्न त्यांच्यासमोर आवासून आहे. याच संकटावर थोडीशी फुंकर मारण्याचं काम सल्या करत असल्याचं दिसून येतंय.