Viral Video : `सैराट` फेम अभिनेत्यानं पेपरमिंट समजून टिश्यू पेपर खाल्ला आणि...
माणसं किती भाबडी असतात, हेच या व्हिडीओमध्ये पाहताना दिसत आहेत. जिथे `सल्या` म्हणजेच अभिनेता अरबाज शेख आणि तानाजी गलगुंडे म्हणजेल `लंगड्या` एका हॉटेलमध्ये असल्याचं दिसत आहे.
Viral Video : 'सैराट' (Sairat movie) चित्रपट प्रदर्शित होऊन आज साधारण पाच वर्षांहून अधिक काळ लोटला. पण, त्या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे. आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या या मित्रांची मैत्री, चित्रपटाचं कथानक, गाणी सर्वकाही आजही तितकंच चर्चेत. पण, आता मात्र त्यातील कलाकार एका वेगळ्याच कारणामुळे नजरा वळवत आहेत. किंबहुना खळखळून हसायला भाग पाडत आहेत. निमित्त ठरतोय तो म्हणजे इन्स्टाग्रामवर (instagram) व्हायरल होणारा एक व्हिडीओ. तुम्हाला इन्स्टा वॉल रिफ्रेश करताना हा व्हिडीओ दिसलाही असावा. पाहिलाय का हा व्हिडीओ तुम्ही?
माणसं किती भाबडी असतात, हेच या व्हिडीओमध्ये पाहताना दिसत आहेत. जिथे 'सल्या' म्हणजेच अभिनेता अरबाज शेख आणि तानाजी गलगुंडे म्हणजेल 'लंगड्या' एका हॉटेलमध्ये असल्याचं दिसत आहे.
जेवण वगैरे झाल्यानंतर सल्या आणि लंगड्या म्हणजेच अरबाज आणि तानाजीपुढे वेटर एका प्लेटमध्ये पेपरमिंटच्या गोळीसारखं दिसणारं काहीतरी ठेवून जातात. तानाजी उत्साहाच्या भरात ही पेपरमिंटची गोळी मुखवास म्हणून दिल्याचं समजत एका क्षणात ती तोंडात टाकतो.
अधिक वाचा : Kantara पाहिला? आता जाणून घ्या त्याच्या Climax चा अर्थ
हे पाहून अरबाज चक्रावतोच. 'हे काय...?' असा प्रश्न करणाऱ्या तानाजीला, नागगोळी.... असं विनोदी उत्तर देत अरबाजनं त्याला हा टिश्यू पेपर असल्याचं सांगितलं. हा व्हिडीओ _maz_prem_ani_tu_ या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
मुख्य मुद्दा असा, की हा (viral video) व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांना त्यांचे असे अतरंगी मित्र आठवले आहेत. तुम्हाला असं कुणी आठवतंय का?
'सल्या' आणि 'लंगड्या'ची यारी, आजही तितकीच भारी...
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या sairat या चित्रपटातून एकिकडून अतिशय संवेदनशील मुद्दा हाताळला गेला होता. तर, दुसरीकडे सहाय्यक भूमिकांमध्ये असणारे कलाकारही प्रसिद्धीझोतात आले होते. तानाजी आणि अरबाज यांच्या भूमिकाही त्यापैकीच एक. पडद्यावर या दोघांनीही 'सल्या' आणि 'लंगड्या' ही पात्र साकारली आणि तिथली मैत्री त्यांनी कायमस्वरुपी टीकवली. आहे की नाही, 'सल्या' आणि 'लंगड्या'ची यारी, आजही तितकीच भारी...