COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सैराटच्या दिग्दर्शक नागराज मंजुळेचा पहिला लघु चित्रपट 'पिस्तुल्या', आतापर्यंत पिस्तुल्या यूट्यूबवर काही लोकांनी अपलोड केला होता. पण त्यातील व्हिडीओचा दर्जा अतिशय खराब असल्याने, व्यवस्थित पाहण्यास अडचणी येत होत्या, आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्याने यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणण्यात आला आहे.


आटपाट प्रॉडक्शनच्या यूट्यूब चॅनेलवर हा सिनेमा


नागराज मंजुळेने त्याच्या आटपाट प्रॉडक्शनच्या यूट्यूब चॅनेलवर हा सिनेमा अपलोड केला आहे. पिस्तुल्या हा फक्त १८ मिनिटांचा लघु सिनेमा आहे. नागराज मंजुळेने बनवलेला हा पाहिला सिनेमा असल्याचं सांगण्यात येतं, या सिनेमाला देखील अनेक पारितोषिकं मिळाली आहेत.


 नागराजच्या पिस्तुल्याविषयी प्रेक्षकांमध्ये चर्चा


सर्वात महत्वाची बाब म्हणजे नागराजच्या पिस्तुल्याविषयी प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे, पण त्यांना अजून पिस्तुल्याची अधिकृत प्रिन्ट पाहायला मिळत नव्हती, ती यूट्यूबवर उपलब्ध झाली आहे. सैराट प्रसिद्धीस आल्यानंतर नागराजचा पहिला सिनेमा कसा होता, किंवा पिस्तुल्याचं नेमकं कथानक काय होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.