Transwoman साईशावर वाईट वेळ, डिझायनरनं रुमवर बोलवून...
गुपितं यावेळी अभिनेत्री पायल रोहतगी आणि साईशा शिंदे यांनी सर्वांसमोर आणली.
मुंबई : Saisha Shinde Reveals Secret: भारतीय फॅशन डिझायनिंग आणि स्टायलिंग विश्वामध्ये साईशा शिंदे हे नाव नवं नाही. सध्या हे नाव चर्चेत आहे ते म्हणजे 'लॉक अप' या रिअॅलिटी शोमुळं.
शोच्या रुपरेषेप्रमाणं बाद फेरीपासून वाचण्यासाठी इथं सेलिब्रिटींनी त्यांच्या आयुष्यातील काही गुपितं उघड करणं अपेक्षित असतं. अशीच गुपितं यावेळी अभिनेत्री पायल रोहतगी आणि साईशा शिंदे यांनी सर्वांसमोर आणली.
साईशाच्या जीवनातील अनेक कठीम प्रसंगांबद्दल आतापर्यंत प्रेक्षकांनी पाहिलं- ऐकलं. आता यातच आणखी एक मोठा उलगडा तिनं केला. याचविषयी सांगताना तिलाही संकोच वाटत होता.
काय म्हणाली साईशा?
आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगाविषयी सांगताना साईशा म्हणाली, 'आजपर्यंत हे गुपित मी कधीच बाहेर आणलेलं नाही. पण, हे जाणून तुम्हालाही धक्का बसेल. एक लोकप्रिय भारतीय डिझायनर आहेत. ते माझेही आवडीचे डिझायनर. त्यांना मी भेटले तेव्हा भारावले. मला त्यांनी हॉटेल रुमवर बोलवलं आणि आमच्यात शारीरिक जवळीक (Sex) निर्माण झाली. यानंतर मला माहित झालं की, त्यांनी 7-8 मुलांसोबतही असंच केलं होतं .'
साईशानं केलेला हा गौप्यस्फोट ऐकल्यानंतर तिथं असणाऱ्या कलाकार स्पर्धकांना जबर धक्का बसला. इतकंच नव्हे, तर तिच्यासोबत असं करणारा तो डिझायनर कोण? हा प्रश्नही सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आला.