मुंबई: बिग बॉसच्या 16 व्या (Bigg Boss 16) सीझनला सुरुवात झाली आहे. या शोमध्ये चित्रपट निर्माता साजिद खान (Sajid Khan) याने देखील सहभाग नोंदवला आहे. मात्र त्याच्या सहभागावरून मोठा वादंग रंगलाय. अनेक मॉडेल, अभिनेत्रींनी #metoo चा आरोप असणाऱ्या साजिदला बिग बॉसमध्ये घेण्यावरून आक्षेप नोंदवला आहे. त्यात आता साजिद खानच्या मदतीसाठी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) धावून आली आहे. राखी सावंतने साजिद खानची पाठराखण केली आहे, तर आरोप करणाऱ्या अभिनेत्रींना चांगलेच सुनावले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा Oops Moment ची शिकार, VIDEO आला समोर 


काय म्हणाली राखी सावंत? 
राखी सावंतचा (Rakhi Sawant) एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती साजिद खानबाबत पापाराझीला प्रतिक्रिया देताना दिसली आहे.'संपूर्ण जग एका बाजूला असले तरी, मी एकटी उभी राहून साजिद खानला पाठिंबा देईन. मी त्याच्या बाजूने उभी राहीन, कारण 4 वर्षांपासून त्याच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत, असे म्हणत तिने साजिदची (Sajid Khan)  पाठराखण केली आहे. पुढे ती म्हणाली की, या गेल्या चार वर्षांत त्याची कारकीर्द उद्ध्वस्त झाली आहे. त्याने कोणताही चित्रपट केलेला नाही. तो डिप्रेशनमध्ये असल्याचे राखीने म्हटले आहे. 


...तर मी चप्पल घेऊन 
या प्रतिक्रियेत ती पुढे बॉलिवूडचं प्रसिद्ध गाणही म्हणते, 'जिसका कोई नहीं उसका खुदा है यारों...', देवाने मला बनवले आहे आणि मी त्याच्या (साजीद) (Sajid Khan)  समर्थनासाठी उभी राहीन. मात्र जर त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास मीही चप्पल हातात घेईन. कारण कोणत्याही मुलीवर अन्याय होऊ देणार नाही. 



आरोप करणाऱ्या अभिनेत्रींना सुनावले 
दरम्यान साजिद खानवर (Sajid Khan)  आरोप करणाऱ्या अभिनेत्रींवर राखी (Rakhi Sawant) भडकली. 'तुम्ही साजिदवर आरोप केलेल्या सर्व मुलींचे बॅकग्राऊंड तपासा.सोशल मीडियावर त्यांचे फोटो पहा...त्या पूर्णपणे न्यूड असतात. चित्रपट मिळवण्यासाठी या काय नाय करून शकत, असा गंभीर आरोप तिने अभिनेत्रींवर केला आहे. 


दरम्यान राखी सावंतने (Rakhi Sawant) साजिद खानला केलेल्या सपोर्टनंतर तिच्यावर टीका होऊ लागली आहे.