`मेरा कॅरेक्टर ढीला था, मैं लड़कियों के साथ...` ; गौहर खानसोबत साखरपुडा मोडण्यावर साजिद खानचं वक्तव्य चर्चेत
साजिद खानचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल...
मुंबई : बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) सध्या एका रिअॅलिटी शोमध्ये असून अडचणीत आहे. जेव्हा पासून साजिदनं रिअॅलिटी शोमध्ये एन्ट्री केली तेव्हा पासून अनेक अभिनेत्री त्याच्या विषयी अनेक खुलासे करत आहेत. साजिदवर काही वर्षांपूर्वी काही अभिनेत्रींनी MeToo चे आरोप केले होते. MeToo च्या आरोपांमुळे 4 वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या साजिद खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये साजिद खान त्याचा साखरपुडा मोडण्याबद्दल, पास्ट रिलेशनशिप्सविषयी आणि त्याच्या काही खासगी गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर साजिदला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
एका रिअॅलिटी शोमध्ये पहिल्याच दिवसापासून साजिद खान एकापाठोपाठ एक मोठे खुलासे करत आहे. शोच्या प्रीमियरमध्ये साजिदनं सलमान खानसमोर कबूल केलं की त्याला त्याच्या स्टारडमचा अभिमान आहे. आता साजिदनं आणखी एक मोठा खुलासा केला, ज्यामध्ये तो स्वतःच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना दिसत आहे आणि याशिवाय तो गौहर खानसोबतचा (gauhar khan) साखरपुडा मोडल्याबद्दलही बोलला आहे. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सध्या साजिदची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यानं त्याच्या पूर्वीच्या रिलेशनशिपविषयी सांगितले होते. व्हिडिओमध्ये, त्यानं गौहर खानशी साखरपूडा झाल्याचे कबूल केले आणि सांगितले की अनेक लिंकअप असूनही त्यानं कधीही लग्न केले नाही. तो म्हणाला की, गौहरसोबत त्याचा साखरपुडा झाला असूनही तो अनेक मुलींना 'आय लव्ह यू' म्हणत असे, त्यांच्यासोबत हँग आउट करत असे. प्रत्येक मुलीला लग्नाचा प्रस्ताव द्यायचा आणि अनेक मुलीही सीरिअस झाल्या आणि या अर्थाने तर मी 350 लग्न करायला हवी होती.' (sajid khan said his character was dheela while being engaged with gauahar khan)
साजिदचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं. इंडस्ट्रीतील 9 महिलांनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. या सर्वांनी चित्रपट निर्मात्यासोबत वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम केले आहे. स्वत:वरील आरोपांनंतर साजिदने 'हाऊसफुल 4'चा दिग्दर्शक म्हणून या चित्रपटापासून दुरावले होते.
या जुन्या व्हिडिओमध्ये साजिद त्याच्या 'कोशिश से कामयाब तक' शोमध्ये किरण जुनेजासोबत बोलताना दिसत आहे. जेव्हा होस्टनं त्याला गौहरपासून विभक्त होण्याबद्दल विचारले तेव्हा साजिद म्हणाला, 'उस वक्त मेरा कैरेक्टर बहुत ढीला था. मैं लड़कियों के साथ घूम रहा था और बहुत झूठ बोलता था.'