Salaar Box Office Collection : `सालार`चा बॉक्स ऑफीसवर धुरळा! सात दिवसात कमावला कोट्यावधींचा गल्ला, वाचा किती केली कमाई?
Salaar Box Office Collection : `बाहुबली` या चित्रपटामुळे प्रभासची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. पण, `बाहुबली`नंतर प्रभाचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. प्रभासच्या बहुप्रतिक्षित `आदिपुरुष` या चित्रपटाने चाहत्यांची निराशा केली होती. अशातच आता प्रभासचा सालार या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत बॉक्स ऑफीसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे.
Salaar Box Office Collection News In Marathi : बहुचर्चित आदिपुरुष या चित्रपटामुळे साऊथ स्टार प्रभासवर अनेकांनी टीका केली होती. मात्र आता प्रभासचा सालार चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजआधीपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. आता रिलीजनंतर या चित्रपटाची क्रेझ आणखी वाढली आहे. चित्रपटगृहात धमाका केल्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
'सालार' चित्रपटात दक्षिण भारतीय अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन देखील दिसत आहे. मीनाक्षी चौधरी आणि श्रुती हसन यांनी अभिनेत्री म्हणून चांगले काम केले आहे. दक्षिण भारतीय सुपरस्टार प्रभासने चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट काम केले आहे. प्रभासच्या अनेक जबरदस्त चित्रपटांमुळे त्याची ओळख परदेशात देखील पोहोचली आहे. प्रभासच्या अभिनयामुळे त्याच्या चित्रपटांना परदेशातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभासच्या चित्रपटांमुळे वर्ल्ड वाइड कलेक्शन खूप मजबूत असल्याचे दिसते. प्रभासच्या
आदिपुरुष या चित्रपटामुळे अनेक टिका केली होती. मात्र त्यानंतर आता प्रभासच्या सालार चित्रपटाला घवघवीत प्रसिद्धी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. सालार चित्रपालाला टक्कर देण्यासाठी अभिनेता शाहरुख खानचा डंकी चित्रपट देखील रिलीज झाला आहे. सालार आणि डंकी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सालार चित्रपटाने 7 दिवसात बॉक्स ऑफिसवर केली 'इतकी' कमाई
सालार चित्रपट प्रदर्शित होऊन 7 दिवस झाले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर एकूण 90.7 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी सालार चित्रपतने 55.00 कोटींची कमाई केली. प्रभासच्या सालार चित्रपटाने तिसर्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 64.07 कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी 42.50 कोटींची कमाई झाली. पाचव्या दिवशी चित्रपटाने 17.00 कोटींची कमाई केली आहे.
6व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 17.00 कोटींची कमाई केली आहे. सातव्या दिवशी सालार चित्रपटने बॉक्स ऑफिसवर 13.50 कोटींची कमाई केली आहे. सालार चित्रपटने सात दिवसांत एकूण 308.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
या ओटीटीवर रिलीज होणार 'सालार'
नेटफ्लिक्स इंडियाने 100 कोटी रुपयांना 'सालार'चे ओटीटी राईट्स विकत घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. हा सिनेमा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात OTT वर उपलब्ध होईल. याबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 'सालार'चे ओपनिंग कलेक्शन शाहरुखच्या पठाण, जवान आणि रणबीरच्या अॅनिमलपेक्षा जास्त आहे. त्यामुळे 2023 चा हा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.
'सालार'चा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. दुसऱ्या भागाचं नाव 'शौर्यंगा पर्व' असेल. मजबूत स्टारकास्ट असलेला सालार बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.