Salim Khan on Salman Khan and Vivek Oberoi's fight over Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायला आपण सगळ्यांनी 25 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ अखेरचं पाहिलं. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे संजय लीला भन्साळी यांनी केलं होतं. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पण त्यानंतर ते दोघं कधीच एकत्र दिसले नाही. ते दोघं विभक्त झाल्यानंतर ऐश्वर्याही विवेक ओबेरॉयसोबत रिलेशनशिपमध्ये आली. या कारणामुळे सलमान आणि विवेक ओबेरॉय यांच्यात भांडणही झालं. या भांडणाला सलीम खान यांनी मुर्खपणा म्हटलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलीम खान यांनी एका मुलाखतीत सलमान आणि विवेकच्या भांडणावर वक्तव्य केलं होतं. त्यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्यांनी म्हटलं की सलमान आणि विवेक दोघेही इमोशनल होते. त्यामुळे त्या दोघांनी कोणताही विचार न करता असं केलं होतं. खरंतर एका मुलाखतीत सलीम यांना विवेक आणि सलमानच्या भांडणावर विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की 'कोणत्याही भावनिक समस्येचं कोणताही तर्कशुद्ध उपाय हा नसतो. सलमान आणि विवेक दोघेही इमोशनल आहेत. त्यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता असं केलं. त्यांना काही वर्षांनंतर ही गोष्ट जाणवेल की ते एका मूर्ख गोष्टीसाठी भांडत होते, कोणीतरी दुसरं घेऊन गेलं, कोणी दुसरंच गेलं आणि हे दोघे त्याच ठिकाणी आहेत.' 


हेही वाचा : बॉलिवूडचा नावाजलेला स्टार तरी आहे कंजूस! फराह खाननं पैशांसाठी फोन करताच अभिनेता म्हणाला...


दरम्यान, ऐश्वर्या आणि सलमानची लव्ह स्टोरी ही सगळ्यांनाच माहित आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान आणि ऐश्वर्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान, रिलेशनशिपमध्ये आले होते. पण त्यांचं नात जास्त काळ टिकलं नाही आणि 2 वर्षातच दोघं विभक्त झाले. त्यानंतर ऐश्वर्या ही विवेकसोबत रिलेशनशिपमध्ये आली. त्यामुळे विवेक आणि सलमानमध्ये भांडण झालं होतं. असं म्हटलं जातं की सलमाननं विवेकला धमकी दिली होती. तर विवेकनं ही धमकी दिल्याची गोष्ट एका प्रेस कॉन्फरंसमध्ये सांगितली. तर सलमान आणि ऐश्वर्यानं एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं नाही. त्या दोघांनी ‘हम दिल दे चुके सनम’ शिवाय ‘हम तुम्हारे हैं सनम’ आणि ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.