बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान (Arbaaz Khan) दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला असल्याने सध्या चर्चेत आहे. अरबाज खान 24 डिसेंबरला मेकअप आर्टिस्ट शूरा खानसह विवाहबंधनात अडकला आहे. या निकाहसाठी संपूर्ण खान कुटुंब उपस्थित होतं. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा निकाह पार पडला. अरबाज खानचं हे दुसरं लग्न आहे. मलायकला घटस्फोट दिल्यानंतर वयाच्या 56 व्या वर्षी तो पुन्हा एकदा नवरदेव झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विवाहसोहळ्याला संपूर्ण खान कुटुंब हजर होतं. लग्नाला दोन दिवस झाले असली तर अद्यापही अरबाज खान आणि शूरा खान यांनी लग्नावर काही भाष्य केलेलं नाही. यादरम्यान वडील सलीम खान यांनी या लग्नावरील मौन सोडलं असून, आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


सलीन खाम यांनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत मुलगा सोहेलच्या दुसऱ्या लग्नाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले आहेत की, "त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या मते हा काही गुन्हा नाही. मी त्यांच्यासाठी फार आनंदी आहे. मी नवरदेव आणि नवरीमुलीला आशीर्वाद दिला आहे".


दरम्यान अरबाज खानने लग्न करण्याआधी तुमच्याशी काही चर्चा केली होती का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "मला वाटत नाही की त्याची काही गरज होती. तो तरुण, सुशिक्षित आहे. तो आपले निर्णय स्वत: घेऊ शकतो. यासाठी माझी परवानगी घेण्याची गरज नाही. त्याने मला फक्त लग्न करत असल्याचं सांगितलं. त्यावर मी ठीक आहे इतकंच म्हणालो".


अरबाज खान आणि शूराची भेट कुठे झाली?


अरबाज खान आणि शूराची पहिली भेट 'पटना शुक्ला'च्या सेटवर झाली होती. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि नंतर त्याचं रुपांतर प्रेमात झालं. बराच काळ ते एकमेकांना डेट करत होते आणि अखेर विवाहबंधनात अडकले. 


6 वर्षांपूर्वी घटस्फोट


शूराच्या आधी अरबाजचं लग्न मलायकाशी झालं होतं. जवळपास 19 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी 2017 मध्ये एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. दोघांना अरहान नावाचा एक मुलगा आहे. अरबाज खानच्या लग्नात अरहानही उपस्थित होता. यावेळी त्याने विशेष परफॉर्मन्स दिला होता.