सलमान लग्न का करत नाही? वडिलांनी केला खुलासा
सलिम खान यांना केला मोठा खुलासा
मुंबई : बॉलिवूडमध्ये सलमान खानचं लग्न हा कायमच चर्चेचा विषय असतो. सलमान खानच्या लग्नाची घाई फक्त कलाकारांनाच नाही तर बॉलिवूड आणि त्याच्या घरच्यांना देखील आहे. सलमान खानच्या आईला त्याचं लग्न बघायचं आहे. याबाबत त्यांनी अनेकदा सांगितलं आहे.
सलमान खानची आई ही स्वतःच आपल्या लाडक्या सलमानचे लग्न पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे. त्या देखील आपल्या मुलाचा सुखी संसार पाहण्यासाठी आसुसलेल्या आहेत. परंतु सलमान खान आपल्या कामांत इतके व्यस्त आहेत की, त्यांच्याकडे लग्न करण्यासाठी वेळच नाही.
मात्र सलमान खानच्या वडिलांनी सलीम खान यांनी त्याच्या लग्न न करण्यामागील खरं कारण सांगितलं आहे. सलमान खानला आणि त्यांच्या कुटुंबियांना लग्नासंबंधित अनेक प्रश्न हे नेहमीच विचारले जातात. सलमान कायमच या प्रश्नावर उडवा उडवीचं उत्तर देतो. मात्र वडिलांनी यामागील सत्य सांगितलं आहे.
दबंग भाईजान हे लग्न का बरं करत नाहीत? याबद्दल सलीम खान यांनी सांगितले की, सलमान हा जेव्हा जेव्हा एखाद्या नवीन चित्रपटात नवीन हिरोईन सोबत काम करतो, तेव्हा तो त्या चित्रपटातील अभिनेत्रीवर प्रेम होते. चित्रपटांत काम करणाऱ्या सर्व अभिनेत्रींचे हे स्वप्न असते की, त्यांना आपल्या फिल्मी करियरमध्ये खूप सक्सेसफुल व्हायचे असते तसेच खूप फेमस देखील व्हायचे असते. तसे तर त्यांचे देखील काहीच चुकत नाही. दबंग भाईजान हा प्रत्येक जेव्हा एखाद्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो, तेव्हा तो तिच्यामध्ये आपल्या आईला शोधण्याचा प्रयत्न करतो.
कारण सलमान खान अशा मूलीसोबत लग्न करण्यासाठी उत्सुक आहे, जी त्याच्या आईसारखे घरातील सर्व काम करेल. मुलांना सांभाळून त्यांचा अभ्यास देखील घेईल. अशा प्रकारची घरेलू मूलगी आपल्या लाडक्या सुपरस्टारला हवी आहे. मात्र अशी मुलगी सलमान खानला काही भेटलेली नाही.