कपिल नाही सुनीलसोबत काम करणार सलमान खान
कॉमेडीकिंग कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात झालेल्या वादानंतर दोघांनी आपल्या वेगवेगळ्या वाटा धरल्या.
मुंबई : कॉमेडीकिंग कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात झालेल्या वादानंतर दोघांनी आपल्या वेगवेगळ्या वाटा धरल्या. कपिल शर्मा पुन्हा कॉमेडी नाईट विथ कपिलमधून समोर आलाय तर सुनिलही 'धन धना धन' रिअॅलिटी शोमधून दिसणार आहे. दरम्यान सुनिल हा भारत सिनेमातही दिसणार आहे. या आगामी सिनेमात सलमान खान आमि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये सुनील हा सलमानच्या मित्राच्या भुमिकेत दिसेल. नुकतेच सुनीलला विशाल भारद्वाजचा सिनेमा 'छुरिया' साठी साईन केल गेल. त्यानंतर आता तो सलमानसोबत दिसणार असल्याचेही स्पष्ट झालयं.
महत्त्वाच्या भूमिकेत
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, 'भारत' मध्ये सुनीलचे कॅरेक्टर आधीच्या अभिनयापेक्षा वेगळे असणार आहे. काही कॉमेडी पंच आणि छोट्या सिन्सपुरता तो मर्यादित नसून महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. कपिलचा शो सोडल्यानंतर सुनील तेवढ्या ताकदीचा शो करु शकेल का ? असा प्रश्न विचारला जात होता. पण मोठमोठे अभिनेते आणि दिग्दर्शक सुनीलला आपल्या प्रोजेक्टमध्ये घेण्यास उत्सूक आहेत.