मुंबई : ‘एक था टायगर’च्या सिक्वलमधून सलमान-कतरिना ही जोडी पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाचे प्रमोशन देखील जोरदार सुरू आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असताना दोघांनी मॅगेझीनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले.


ग्लॅमरस अंदाज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वोग मॅगेझीनच्या कव्हर पेजवर सलमान-कतरिना हटके अंदाज पहायला मिळत आहे. यात दोघांनीही ब्लॅक ड्रेस घातला आहे. दोघांचा ग्लॅमरस अंदाज लक्षवेधी ठरत आहे.



 


तब्बल ५ वर्षानंतर एकत्र 


खूप काळ रिलेशनमध्ये राहील्यानंतर दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तब्बल ५ वर्षानंतर ही जोडी दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या ‘टाइगर जिंदा है’पुन्हा एकदा एकत्र येत आहे.


ट्रेलर हिट


या चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत लोकप्रिय ठरला. त्याला ७०० हजारहून अधिक लाईक्स मिळाले. आस्ट्रिया, ग्रीस, मोरक्को, अबु धाबी आणि भारत या देशात चित्रपटाचे शूटिंग झाले आहे.