Salman Khan and Karan Johar : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान (Salman Khan) लवकरच त्याचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान त्याचे चित्रपट हे सणांच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतो. दरम्यान, सलमान आताच त्याच्या पुढच्या ईदच्या चित्रपटासाठी तयार झाला आहे. सलमान लवकरच करण जोहरसोबत (Karan Johar) दिसणार आहे. तर हा चित्रपट पुढच्यावर्षी ईदला प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बॉलिवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार लवकरच सलमान खान करण जोहरसोबत एक चित्रपट करणार आहे. तर हे दोघे तब्बल 25 वर्षांनंतर एकत्र येणार असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या या बिग बजेट चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. पण हा कोणता चित्रपट असणार आहे. यात काय वेगळं असणार आहे याची सलमानच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे असेही म्हटले जात आहे की सलमान या स्क्रिप्टवर विचार करत आहे. त्याच्याकडे आणखी काही चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत. त्यापैकी एक धर्मा प्रोडक्शनची आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, सलमान आणि करण जोहरीची जोडी ही सगळ्यात शेवटी 25 वर्षांपूर्वी म्हणजेच 1998 साली प्रदर्शित झालेल्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील  सलमानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात सलमानची मुख्य भूमिका नसली तरी त्याची महत्त्वाची भूमिका होती. आता त्या दोघांचे चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी आतुर आहेत. असे ही म्हटले जाते की सलमानला या चित्रपटात कास्ट केल्यानंतर करण जोहर स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. मात्र, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 


हेही वाचा : अभिनेता Sahil Khan अडचणीत, महिलेनं गंभीर आरोप करत केली तक्रार दाखल


'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाव्यतिरिक्त सलमान लवकरच 'टायगर 3' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत कतरीना कैफ आणि इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सलमान आणि शाहरुख खान देखील पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. त्या दोघांचा एक स्पाय सिनेमा असणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘पठाण वर्सेस टायगर’ असे असणार आहे.  यशराज बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती होणार आहे.  ‘पठाण वर्सेस टायगर’ हा बिग बजेट चित्रपटांपैकी एक असणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचं बजेट हे  200 ते 250 कोटींमध्ये असणार असेल म्हटले जात होते. मात्र, आता असं म्हटलं जातं की या चित्रपटाचं बजेट हे 300 कोटी असणार आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे.