मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. दोघांनीही आपल्या जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत शाही पद्धतीने लग्न केले. या जोडप्याचे अभिनंदन करताना अनेक बॉलीवूड स्टार्सनी खूप महागड्या भेटवस्तू दिल्या आहे. त्यामध्ये कतरिनाच्या एक्स बॉयफ्रेंड्सने देखील कतरिनाच्या गिफ्टसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला असल्याचं सांगितलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकी आधी कतरिनाचं नाव अभिनेता सलमान खान आणि रणबीर कपूर यांच्यासोबत जोडलं जात होतं. पण दोघांसोबत असलेलं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही. पण सलमान आणि रणबीर मात्र त्यांच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या लग्नात गिफ्ट्स पाठवायला विसरले नाहीत. 



बॉलिवूड लाइफनुसार, कतरिनाच्या एक्स बॉयफ्रेंडन्सने कतरिनाच्या लग्नात प्रचंड खर्च केला असं सांगण्यात येत आहे. कतरिना कैफच्या लग्नात सलमान खानने बॉलिवूडलाइफच्या रिपोर्टनुसार, विकी-कतरिनाला तीन कोटींची रेंज रोव्हर कार भेट दिली असल्याचं सांगितलं जात आहे.


कतरिनाच्या लग्नात रणबीर कपूरनेही कतरिनाला सुमारे 2.7 कोटींचा हिऱ्याचा हार दिला असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय रणबीर कपूरची गर्लफ्रेंड आलिया भट्टने कतरिनला लाखो किमतीचे परफ्यूम भेट दिल्याचं समोर येत आहे. पण यासंबंधी सलमान, रणबीर आणि कतरिनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली आहे.