सलमानचा वाढदिवस कतरिनामुळे बनला आणखी खास, शुभेच्छा देत म्हणाली, `....नेहमी तुझ्यासोबत राहिल`
कतरिना ही सलमानची खूप जवळची आणि खास मैत्रीण आहे.
मुंबई : बॉलीवूडचा टायगर आणि भाईजान सलमान खान आज आपला 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण सलमानच्या या खास दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. जगभरातून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. पण या सगळ्यात खास सलमानचा आजचा दिवसी आणखी खास ठरला ती व्यक्ती आहे कतरिना कैफ. कतरिनाचे नुकतेच विकी कौशल सोबत लग्न झालं आहे आणि ती आपल्या नवऱ्यासोबत ख्रिसमस साजरा करत आहे. परंतु या सगळ्यामधून वेळ काढत कतरिनाने सलमानला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे.
कतरिना ही सलमानची खूप जवळची आणि खास मैत्रीण आहे. ही गोष्ट कोणापासूनही लपलेली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत सलमानच्या वाढदिवशी कतरिना शुभेच्छा देताना कशी बरं मागे राहिल?
कतरिनाने सलमानला वाढदिवसाच्या नुसत्या शुभेच्छाच दिल्या नाहीत तर, तिने आपल्या जवळच्या मित्रासाठी एक खास नोटही लिहिली आहे. ही नोट सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.
कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सलमान खानचा मोनोक्रोम फोटो शेअर करून दबंग खानला शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिनाने लिहिले - 'सलमान खान तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्रेम, प्रकाश आणि तेज नेहमीच तुमच्याबरोबर असू दे.' मेसेजसोबतच कतरिनाने हार्ट इमोजीही ठेवला आहे. तसेच त्यासोबतच कतरिनाने तिच्या पोस्टमध्ये हॅप्पी बर्थडे स्टिकरही पाठवले आहेत.
कतरिना-सलमानने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं
चांगले मित्र असण्यासोबतच सलमान खान आणि कतरिना हे चांगले सहकलाकार देखील आहेत. सलमान आणि कतरिनाने पार्टनर, मैने प्यार क्यूं किया, भारत, टायगर जिंदा है, एक था टायगर यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. सलमान आणि कतरिनाच्या जोडीला नेहमीच चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.
टायगर फ्रँचायझीच्या पुढच्या चित्रपटात कतरिना आणि सलमान पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. विकी कौशलसोबत लग्नानंतर कतरिनाचा सलमानसोबतचा हा पहिलाच चित्रपट असेल. सलमान आणि कतरिनाच्या जोडीने नेहमीच पडद्यावर धुमाकूळ घातला आहे.
रिअल लाईफबद्दल बोलायचे झाले तर कतरिना सलमानच्या बर्थडे सेलिब्रेशनमधून गायब दिसली, तर कतरिनाच्या लग्नातही सलमान न दिसल्याने चाहत्यांची निराशा झाली. आता या दोघांच्या जोडीला आगामी चित्रपटात रसिकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.