भाईजानच्या बर्थ डे ला चाहत्यांना केक ऐवजी लाठ्या,सलमानच्या घरासमोर राडा
सलमानच्या चाहत्यांमध्ये सलमानला पाहण्यासाठी कमालीची उत्सुकता होती. सलमानला शुभेच्छा देण्यासाठी बंगल्याबाहेर गर्दी होती.
मुंबई : आज इंटरनेटवर हवा आहे ती सलमान खान आणि त्याच्या वाढदिवसाची. आज सलमान खाननं आपल्या आयुष्यातील 57 वर्ष पुर्ण केली आहेत. दरवर्षी प्रमाणे आजही सलमानच्या अपार्टमेंटबाहेर सलमानची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली. मात्र यावेळी ईथे धक्कादायक प्रकार घडल्याचं चित्र पहायला मिळालं. सलमानच्या चाहत्यांमध्ये सलमानला पाहण्यासाठी कमालीची उत्सुकता होती. सलमानला शुभेच्छा देण्यासाठी बंगल्याबाहेर गर्दी होती. मात्र गर्दी हटवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. भाईजानच्या बर्थ डेला चाहत्यांना केक ऐवजी लाठ्या मिळाल्याने सलमानच्या घरासमोर राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
नुकतंच सलमान खानच्या प्री बर्थडे पार्टी पार पडली यावेळी सगळ्यात जास्त चर्चा झाली ती संगीता बिजलानीची. आपल्या एक्स गर्लफ्रेंड्ला कीस करत त्यानं यावेळी संगीतासोबत गाळाभेट केली. सध्या हा फोटो सगळीकडेच व्हायरल होत आहे. याचबरोबर शाहरूख खान आणि सलमान खान यांची भेट यावेळी पाहायला मिळाली. यावेळी शाहरूख खाननं सलमान खानचा हात पकडून पोझ दिली. हा फोटोही सगळीकडे व्हायरल होत आहे. नेहमी त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असणारा सलमान त्याच्या लव्हलाईफमुळेही चर्तेत आला आहे. खासकरुन ऐश्वर्यासोबतचं त्याचं नातं खूप गाजलं
सलमान आणि ऐश्वर्याचं प्रेमप्रकरण
ऐश्वर्या आणि सलमान खान (salman khan) यांचं प्रेमप्रकरण हा आजही रंजकतेने वाचला जाणारा विषय आहे. प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघे असे वेगळे झाले कि आज एकमेकांचं तोंड पाहणंसुद्धा पसंत करत नाहीत.
बॉलीवूडमध्ये अनेक प्रेमप्रकरणं झाली त्यांचं ब्रेकअप सुद्धा झालं पण आज ते एकमेकांचे फ्रेंड्स म्हणून वावरत आहेत . मग सर्वाना हा प्रश्न पडतो कि नेमकं असं काय झालं असावं कि ऐश्वर्या आणि सलमान आज असे जगताहेत.
तर दुसरीकडे सलमान खान नेहमी त्याच्या लग्नामुळे चर्चेत असतो. अभिनेता लग्न कधी करणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष आहे. सलमान आणि संगीताचं नातं तुटल्यानंतर त्याचं नावं असंख्य तरुणी आणि अभिनेत्रींशी जोडलं गेलं. सोनाक्षी सिन्हा, पूजा हेगडे या नव्या जोमाच्या अभिनेत्रींशीची त्यांचं नाव जोडलं गेलं. तर, ऐश्वर्या राय, करिष्मा कपूर , लुलिया वंतूर यांच्यासोबतचं त्याचं नातंही बरंच चर्चेत राहिलं. आता प्रश्न राहिला सलमानच्या लग्नाचा, तर ते नेमकं कधी होणार याचं उत्तर खुद्द भाईजानच देऊ शकतो.