BIRTHDAY SPECIAL; सलमानची एक्स गर्लफ्रेंड वयाच्या साठीनंतरही लूक्समध्ये देतेय ऐश्वर्याला टक्कर
सलमानसोबतच्या नात्यामुळे संगीता चांगलीच चर्चेत होती. त्यावेळी संगीत सलामनला डेट करत होती. दोघं लग्न करणार होते, पण काही गोष्टींमुळे संगीताने सलमानसोबतचं नातं तोडून टाकलं, त्यानंतर ते एकत्र दिसले नाहीत.
मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान त्याच्या ऑन स्क्रिन भूमिकांमुळे तर सगळ्याच लक्षवेधून घेतोच, पण त्याच्या पर्सनल लाईफस्टाईलमुळे सुद्धा तो बऱ्याचदा चर्चेत असतो.
एकीकडे सलमानने अद्याप लग्न का केलं नाही, हा प्रश्न त्याच्या लाखो फॅन्सला पडला आहे, तर दुसरीकडे त्याची लव्ह लाईफ देखील सगळ्यांना तोंडपाठ आहे. बॉलिवूडमधील कित्येक ग्लॅमरस अभिनेत्री सलमानच्या प्रेमात होत्या.
त्यातील सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी हीचा आज वाढदिवस, अभिनेत्री संगीता बिजलानी तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. या वयात देखील तिने स्वत:ला चांगलच मेन्टेन ठेवलंय. संगीता हटके अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सलमानसोबतच्या नात्यामुळे संगीता चांगलीच चर्चेत होती. त्यावेळी संगीत सलामनला डेट करत होती. दोघं लग्न करणार होते, पण काही गोष्टींमुळे संगीताने सलमानसोबतचं नातं तोडून टाकलं, त्यानंतर ते एकत्र दिसले नाहीत.संगीता बिजलानी सध्या पोस्ट करत असलेल्या फोटोंना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. संगीता स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा देखील करते.
संगीता आणि सलमानने अनेक मासिकांसाठी आणि ब्रॅण्डसाठी एकत्र काम केलं आहे. संगीता बिजलानीने क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनसोबत लग्न केलं होतं, पण त्यांचं नातं टिकू शकलं नाही आणि 2010 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.