मुंबई : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) लवकरच सुरु होणार आहे. सलमान खान (Salman Khan) 1 ऑक्टोबर 2022 पासून शो सुरू करणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात कोण पाहुणे असतील,यातले तीन चेहरे समोर आले आहेत. बिग बॉस हा असा शो आहे. जो प्रसारित होण्यापूर्वीच प्रसिद्धीच्या झोतात येतो. पण ज्या गोष्टीची सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे सलमान खानची फी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक सीझनच्या आधी बातम्या येऊ लागतात की सलमानने शोसाठी किती फी घेतली आहे आणि दरवर्षी सलमान खानच्या फीची रक्कम वाढतच जाते. मात्र आता सलमानने त्याच्या फीबाबत मौन तोडलं आहे.


इतके पैसे मिळाले तर मी कधीच काम करणार नाही
बिग बॉस 16 संदर्भात सलमान खानने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्याचबरोबर सलमान म्हणाला की,  मला हजार कोटी रुपये फि मिळत असल्याच्या अफवा आहेत, पण मला एवढे पैसे मिळत नाहीत. इतके पैसे मला आयुष्यात कधीच मिळणार नाहीत. इतके पैसे जर मला आयुष्यात कधी मिळाले तर मी आयुष्यात कधीच काम करणार नाही. माझे अनेक खर्च आहेत. जसे की, वकिलांची फी


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


1 ऑक्टोबरपासून शो सुरू होत आहे
1 ऑक्टोबरपासून बिग बॉस 16 सुरू होत आहे. जे प्रत्येक सीझनप्रमाणे यावेळीही सलमान खान होस्ट करणार आहे. 3 स्पर्धकांचे चेहरे समोर आले आहेत. अब्दुल राजिक, गौतम विज यांच्याशिवाय 'इमली' फेम टीव्ही अभिनेत्री सुंबूल तौकीर खानची या शोमध्ये एन्ट्री निश्चित होणार आहे.