मुंबई : सुपरस्टार सलमान खानला इंडस्ट्रीत अनेक नावांनी संबोधल जातं. कुणी सलमानला दबंग खान म्हणतो तर कुणी त्याला 'चुलबुल पांडे' संबोधतो. मात्र या आधीपासून एक नाव जास्त लोकप्रिय आहे. आणि ते म्हणजे 'भाई' सलमान खानला त्याच्या घरातील व्यक्तींपासून ते अगदी चाहते, सिनेकलाकार 'भाई' या नावाने हाक मारतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? की ते अशी हाक का मारतात? आणि याची सुरूवात कधीपासून आणि कुणापासून झाली. स्वतः सलमान खानने याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, 'भाई' हा शब्द एकायला तसा निगेटिव्ह आहे. जसं कुणी दबंग व्यक्ती आहे आणि त्याला भाई म्हटलं जातं असं मला वाटतं. रेस 3 चा स्टार असलेल्या सलमान खानने सांगितलं की, सोहेल खान मला 'भाई' या नावाने हाक मारायचा. मग त्याच्यासोबत असलेले मित्र मला "भाई' अशी हाक मारू लागले. काही काळाने सगळेच लोकं मला 'भाई' म्हणू लागले. सलमान खान म्हणाला की, सलमान खान ते सल्लू मग सल्ले त्यानंतर सलमान भाई आणि आता फक्त 'भाई' हा प्रवास खूप लांब आहे. 


सलमान खानचा रेस 3 हा सिनेमा आज 15 जून रोजी प्रदर्शित झाला आहे. सलमानने रमजानच्या दिवशी प्रत्येकाला सिनेमाच्या मार्फत ईदी दिली आहे.