मुंबई : यावर्षी बॉलिवूड स्टार सलमान खानने त्याच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसोबत नवीन वर्ष 2022 साजरं केलं. त्याची रूमर्ड गर्लफ्रेंड लूलिया वंतूर काल रात्री अभिनेत्यासोबत पार्टी करताना दिसली. या पार्टीत सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी व्यतिरिक्त बीना काक सहभागी झाल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनवेलच्या फार्महाऊसवर जल्लोष!
बीना काक यांनी इन्स्टाग्रामवर न्यू इयर पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, सलमान खान कॅज्युअल ब्लॅक टी-शर्ट आणि पांढरा जॅकेट घातलेला दिसत आहे. त्याचबरोबर तो बिना काकसोबत पोजही देताना दिसत आहे. हे सेलिब्रेशन सलमानच्या पनवेलच्या फार्महाऊसवर झाल्याचं दिसत आहे.



इंस्टाग्रामवर फोटो
सलमानची गर्लफ्रेंड युलियानेही बीना काक, अमृता काक, सामंथा लॉकवुड, संगीता बिजलानी यांच्यासोबतचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. एका व्हिडिओमध्ये तो 'हॅपी न्यू इयर' म्हणताना दिसत आहे.