भाईच्या गर्लफ्रेंडचा Birthday! लुलियासोबत सलमानचे `हे` खास रोमॅटिण्क क्षण कॅमेऱ्यात कैद
सलमान खान तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या खूप चर्चा सुरू झाल्या होत्या.
Salman Khan and Lulia Vantur: कतरिनासोबत रिलेशनशिप्सच्या चर्चा सुरू असताना सलमान खान आपल्या चित्रपटांपेक्षा तिच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे जास्त चर्चेत आला होता. त्यानंतर त्या दोघांचेही ब्रेकअप झाले. या बेक्रअपच्या नंतरही खूप चर्चा रंगल्या. सलमान लग्न कधी करणार हा सर्वांनाच पडलेला प्रश्न. तो कधीतरी लग्न करेल अशीही अनेकांना आशा लागून राहिली आहे. मध्यतंरी त्याच्या लग्नाच्याही खूप अफवा पसरल्या होत्या. त्यात मध्येच डोकं वर काढलं होतं ते लुलिया वान्तूर या अभिनेत्रीनं. सलमान खान तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या खूप चर्चा सुरू झाल्या होत्या. आजही या चर्चा काही केल्या कमी होत नाहीत.
सलमान आणि लुलियाच्या अफेअरच्या चर्चांना आता पुन्हा एकदा फोडणी मिळाली आहे. रविवारी लुलियाचा वाढदिवस साजरा झाला आणि त्यावेळी सलमान खानसोबत सलमानचा अख्खा परिवार सामील झाला होता. सलमान खानसह सौमिल खान, अर्बाज खान. आयुष शर्मा, सलमानची बहीण अप्रिता यांनी लुलियाच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. लुलियाचा वाढदिवस नक्की परदेशात साजरा झाला की भारतात याबद्दल अद्याप काही खुलासा नाही पण तिचा वाढदिवस मुंबईत साजरा झाला असून तिच्यासाठी एक छोटेखानी बर्थेंडे पार्टी आयोजित करण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे.
यावेळी सलमानच्या संपुर्ण कुटुंबाने लुलियाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या पार्टीचे काही खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावेळी सगळेच आनंदाने तिचा वाढदिवस साजरा करताना दिसत असून सलमान खान तिच्यासाठी खास टाळ्या वाजवत तिच्या जवळ उभा आहे.
सलमान आणि लुलिया गेली अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते असे बोलले जाते. ते खूपदा एकत्रही स्पॉट झाले आहे. आपल्या रिलेशनशिप ते दोघंही अद्याप कन्फर्म नाही आहेत. तसेच ते एकमेकांना डेट करत नसल्याच्याही चर्चा आहेत. परंतु आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ते दोघं परत रिलेशनशिपमध्ये आहेत का या चर्चेला उधाण आले आहे.