नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता वरून धवन याच्या 'जुडवा २' या आगामी चित्रपटाबद्दल सुपरस्टार सलमान खान खूप उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. जुडवा २ मध्ये 'राजा' और 'प्रेम' या वरुण साकारत असलेल्या भूमिका सलमानने 'जुडवा' चित्रपटात साकारल्या होत्या. 'जुडवा २' या चित्रपटाचे दिग्दर्शन डेविड धवन यांनी केले असून ९० च्या दशकात आलेल्या 'जुडवा' या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जुडवा २' मध्ये प्रेम ही व्यक्तिरेखा सरळ साध्या माणसाची असून राजा ही व्यक्तिरेखा काहीशी टपोरी, मस्तीखोर अशी आहे. 


'ऊंची है बिल्डिंग' आणि 'टन टना टन' या गाण्यांवर आपण सलमानला थिरकताना पाहिले होते आता 'जुडवा २' च्या निमित्ताने या गाण्यांवर वरुण आपल्या नृत्याची झलक दाखवणार आहे. अलीकडेच सलमानने 'जुडवा २' ची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यासोबत 'टन टना टन' या गाण्यावर ठेका धरला. त्याचा व्हिडीओ जॅकलिनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. 



१९९७ मध्ये आलेल्या जुडवा या चित्रपटात सलमान खान, करिश्मा कपूर, रंभा, कादर खान, शक्ति कपूर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. तर जुडवा २ मध्ये वरुण, तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसतील. हा चित्रपट २९ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.