Himachal Pradesh Election Result 2022: अभिनेता सलमान खान (Salman Khan) फक्त बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नाही, तर अनेकांचा गॉडफादर देखील आहे. सलमान खानने आजपर्यंत अनेक नव्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये संधी दिली. अनेकांचा गॉडफादर असलेला भाईजान फक्त बॉलिवूडमध्येच नाही सलमानचं कुटुंब राजकारणात देखील सक्रिय आहे. नुकताच गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल (Himachal Pradesh Election Result 2022) जाहीर झाले. यामध्ये सलमानच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा वियज झाला आहे. म्हणून खान कुटुंब चर्चेत आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानची बहिण अर्पिता खानचे (Arpita Khan-sharma) सासरे अनिल शर्मा विधानसभा निवडणुकीत (Himachal Pradesh) विजय झाला आहे. अर्पिताचा पती आणि अभिनेता आयुष शर्माने (aayush sharma) ही विजयाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत, सर्वांचे आभार देखील मानले आहेत. 


आयुष शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. व्हिडीओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये, 'अभिनंदन बाबा आणि कुटुंबावरील विश्वास कायम ठेवण्यासाठी मंडीतील सर्व मतदारांचे आभार....' सध्या अभिनेत्याने केलेली पोस्ट सर्वत्र चर्चेत आहे. 



अनिल शर्मा हे अर्पिता शर्माचे सासरे असल्यामुळे खान कुटुंब चर्चेत आहे. अनिल शर्मा यांनी भाजपच्या (BJP) तिकीटावर निवडणूक लढवली असून विजय मिळवला आहे. महत्त्वाचं म्हणजे शर्मा कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून राजकाराणात सक्रिय आहे. (Salman Khan direct connection with Himachal Pradesh Election)



वाचा | चक्क ऐश्वर्याच्या लेकीची सलमान खानलाच 'पा' म्हणून हाक; व्हायरल व्हिडिओमुळे एकच चर्चा


 


गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुजरातमध्ये भाजपची सत्ता कायम राहिली आहे. हिमाचलमध्ये मात्र काँग्रेसने बाजी मरली. हिमाचलमध्ये काँग्रेसने 40 तर भाजपने 25 जागा जिंकल्या आहेत.