राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या (Baba Siddique Murder) केल्याने गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) सध्या चर्चेत आहे. सलमान खानशी (Salman Khan) असणाऱ्या मैत्रीमुळे बाबा सिद्दिकींची हत्या केल्याचा दावा लॉरेन्स बिष्णोईने केला आहे. या हत्येनंतर सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली असून, दुसरीकडे जेलमधून एक गँगस्टर इतकं मोठं हत्याकांड करत असल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यादरम्यान सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला झूम कॉल करण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. सध्या अमेरिकेत स्थायिक असणाऱ्या सोमी अलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून साबरमती सेंट्रल जेलमध्ये असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आम्ही सगळे सध्या....', बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर खान कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया, अरबाज म्हणाला, 'सलमान फार...'


 


सोमी अलीचा लॉरेन्सला थेट संदेश


सोमी अलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लॉरेन्स बिष्णोईचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे की, "हा लॉरेन्स बिष्णोईला थेट संदेश आहे. नमस्ते, लॉरेन्स भाई, ऐकलं आहे आणि पाहिलंही आहे की तुम्ही जेलमधून झूम कॉल करु शकता. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. हे कसं काय शक्य होऊ शकतं हे मला कृपया सांगा. आमची जगातील सर्वात आवडत्या जागांमध्ये राजस्थान आहे. आम्हाला तुमच्या मंदिरात पूजेसाठी येण्याची इच्छा आहे. पण त्याआधी तुमच्यासोबत झूम कॉल केला तर, आणि पूजेनंतर काही गप्पा झाल्या तर.... या तुमच्या फायद्याच्याच गोष्टी आहेत यावर विश्वास ठेवा. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दिलात तर फार उपकार होतील. धन्यवाद".



सोमीने याआधी बिष्णोई समाजाला केली होती विनंती


सोमी अलीचं 1999 मध्ये सलमान खानशी ब्रेकअप झालं. यानंतर ती मुंबईतून अमेरिकेत स्थलांतरित झाली आणि तिथेच स्थायिक झाली. सलमान खानशी असणाऱ्या आपल्या नात्यात अनेक अडथळे आल्याचं सांगताना तिने अनेकदा त्याचा बचावही केला आहे. मे महिन्यात हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोमीने सांगितलं होतं की, "जर तुम्ही एखाद्याच्या हत्येचा प्रयत्न करत असाव किंवा त्याच्यावर गोळ्या झाडत असाल तर तुम्ही मर्यादा ओलांडत आहात. मी शिकारीचा खेळ म्हणून समर्थन करत नाही, पण अनेक वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. सलमान 1998 मध्ये फार तरुण होता. मी विष्णोई समाजाच्या प्रमुखांना विनंती करु इच्छिते की, त्यांनी हे विसरुन आता पुढे जावं. जर त्याने चूक केली असेल तर मी त्याच्या वतीने माफी मागते. कृपया त्याला माफ करा".


"सलमान असो किंवा कोणीही सर्वसामान्य असो, जीव घेणं हे स्विकारार्ह नाही. जर तुम्हाला न्याय हवा असेल तर कोर्टात जावं. माझा भारताच्या कायदा व्यवस्थेवर, वकिलांवर पूर्ण विश्वास आहे. सलमानला दुखापत करुन तुम्हाला तुमचं काळवीट परत मिळणार नाही असं आवाहन मला विष्णोई समाजाला करायचं आहे. जे झालं ते बदलू शकत नाही. आता ते सर्व जाऊ द्यावं," असं आवाहन तिने केलं होतं.