The Kashmir Files : सध्या देशात The Kashmir Files या चित्रपटाचीच चर्चा आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. पण यावरुन राजकारण देखील सुरु आहे. अनेकांनी आ चित्रपटाचं कौतूक केलंय. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याने देखील हा सिनेमा पाहिला असून त्याने देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. (Salman Khan On The Kashmir Files)


सलमान खानकडून कौतूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुपम खेर (Anupam Kher) यांनी याबाबत खुलासा केला आहे. याआधी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि आमिर खान (Aamir Khan) सारख्या कलाकारांनी देखील कौतुक केले होते. आता सलमान खाननेही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.


अनुपम खेर यांना या चित्रपटाच्या यशावर सगळेच गप्प का बसले आहेत, असे विचारले असता ते म्हणाले, 'हा चित्रपट एवढी चांगली कामगिरी करत आहे हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहे.' शोले बनला तेव्हा मला स्वतः रमेश सिप्पी (Ramesh Sippi) यांनी सांगितले होते की, हा चित्रपट पहिले तीन आठवडे चालला नाही. कारण भारतात हे लोकांना समजले नाही. असाही चित्रपट बनवता येतो. पहिल्या तीन आठवड्यात हा चित्रपट फ्लॉप ठरला पण नंतर तो खूप हिट ठरला. हम आपके है कौन या बाबतीतही असेच घडले. लोक म्हणायचे देवाने काय हा लग्नाचा व्हि़डिओ बनवला आहे. पण त्या चित्रपटानेही भरपूर कमाई केली.'


RRR चित्रपटाशी टक्कर


The Kashmir Files ची बॉक्स ऑफिसवर धूम सुरू आहे. चित्रपटाने आतापर्यंत 217.50 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर SS राजामौली यांच्या रिलीज झालेल्या RRR चित्रपटाशी टक्कर देत आहे. द कश्मीर फाईल बाबत असे बोलले जात आहे की हा चित्रपट तिसऱ्या वीकेंडपर्यंत 225 कोटींची कमाई करेल आणि तिसऱ्या वीकेंडला 35 कोटींची कमाई करू शकेल.त्यामुळे हा चित्रपट जवळपास 300 कोटींची कमाई करेल अशी शक्यता आहे.