Katrina Kaif ला मिनी स्कर्टमध्ये पाहून संतापला सलमान, म्हणाला...
`कतरिनाला मिनी स्कर्टमध्ये पाहिल्यानंतर मला...`, Ex-Girlfriend ला छोट्या कपड्यांमध्ये पाहिल्यानंतर संतापला भाईजान
मुंबई : एक काळ असा होता जेव्हा अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या नात्याबद्दल तुफान चर्चा रंगलेल्या असायच्या. पण प्रेमाच्या बाबतीत सलमानचं नशीब फार काही ग्रेट नसल्यामुळे कतरिनासोबत देखील त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान आणि कतरिना एकेकाळी सीरियस रिलेशनशिपमध्येही राहिले होते. सलमान आणि कतरिना केवळ त्यांच्या उत्तम बाँडिंगसाठीच नव्हे तर त्यांच्या उत्कृष्ट सिनेमांसाठी देखील ओळखले जातात.
एका मुलाखतीदरम्यान सलमान खानने कतरिना कैफला शॉर्ट स्कर्टमध्ये बघायला आवडत नसल्याचं सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले. सलमान म्हणाला होता - मी एकदा कतरिनाला मिनी स्कर्टमध्ये पाहिले होतं, मला ते आवडले नाही, तेव्हा मला प्रचंड राग येत होता.'
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने आणखी एका मुलाखतीत म्हटलं की, 'कोणत्याही अभिनेत्रीला ऑनस्क्रीन किस करायला मला लाज वाटते. एवढंच नाही, तर कतरिना कैफला ऑनस्क्रीन किस करू शकत नसल्याचं देखील सलमानने सांगितलं.
दरम्यान, ब्रेकअप होऊनही कतरिना आणि सलमान आजही चांगले मित्र आहेत. कतरिना सलमान खानला आपला मेंटर मानते. दोघांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सलमान खान आणि कतरिना कैफ लवकरच 'टायगर 3' सिनेमात दिसणार आहेत.