खळबळजनक! तारीख सांगत सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
Salman Khan Death Threat: सलमान खानच्या `किसी का भाई किसी की जान` (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खान आनंदात असताना त्याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
Salman Khan Death Threat : आताची सर्वात मोठी बातमी...अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्या बातमी नंतर मुंबई पोलिसांसह भाईजानच्या चाहत्यांची झोप उडाली आहे. सलमान खानला जीव मारण्याचा धमक्यांचा सिलसिला संपताना दिसत नाही आहे. यावेळी आलेल्या कॉलवर सलमान खानला कुठल्या दिवशी मारणार आहे ते सांगण्यात आलं आहे.
यावेळी सांगितली तारीख...
सोमवारी 10 एप्रिल 2023 ला मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला राजस्थानमधील जोधपूरमधून फोन आला. या फोनवर रोकी भाई नावाच्या व्यक्तीने अभिनेता सलमान खानला 30 एप्रिल 2023 ला जीवे मारण्याची धमकी दिली. या फोननंतर मुंबई पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली आहे. या प्रकरणाचा ते कसून तपास करत आहेत.
यापूर्वीही आला होता धमकीचा कॉल
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक वेळा धमक्या आल्या आहेत. एकदा फेसबूक वरुन धमकी देण्यात आली होती. गेल्या महिन्यात चिठ्ठी देत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. वांद्रेच्या बॅंड स्टॅंड या परिसरात सलमानचे वडील सलीम खान हे वॉकला गेले असताना एकाने चिठ्ठी दिली होती.
त्यानंतर सलमानला एका मेलद्वारेही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्या मेलमध्ये दिल्लीच्या तुरुंगात असलेला गुंड बिश्नोईच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. या प्रकरणात मुंबई पोलीस आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मेल करणाऱ्या गुंडला अटक केली आहे.
भाईजान 'किसी का भाई किसी की जान' प्रमोशनमध्ये व्यस्त
सलमान खान 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट 21 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनाही धमकी
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Death Threat Call) यांनीही जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला आहे. मुंबई पोलिसांनी तातडीने चौकशी करत कॉल करणाऱ्याला ताब्यात घेतल आहे. दारुच्या नशेत त्याने मुंबई पोलिसांना फोन केला होता असं चौकशी दरम्यान समोर आलं आहे.